दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, रोहित पवारांची मोदींकडे मागणी…!

दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, रोहित पवारांची मोदींकडे मागणी…!

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे वृत्त आता खुद्द पाकिस्ताने कबुल केले आहे. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा जागतिक संघटनेकडे उघड पडला आहे. याच पाश्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, पाकिस्तानने पहिल्यांदाच दाऊद पाकिस्तानात असल्याची कबुली दिली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाला रसद पुरवणाऱ्यांवर देखरेख ठेवणाऱ्या ‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’ या संस्थेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे.

पाकिस्तानने ८८ दहशतवादी संघटनांवर, व्यक्तींवर बंदी, निर्बंध घातले आहेत. त्याबाबतची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत दाऊद इब्राहिमचा पत्ता देण्यात आला आहे. दाऊद इब्राहिमचा पत्ता हा ‘व्हाइट हाउस, सौदी मशीदजवळ, क्लिफ्टन, कराची’ असा देण्यात आला आहे.

मागील अनेक वर्षांपासून दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याचा दावा भारताकडून करण्यात येतो. मात्र, पाकिस्तानने हा दावा फेटाळून लावला होता. आता मात्र, ‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’च्या कार्यवाहीमुळे पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: