मास्क आणि हात धुणे ही सध्याची लस – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मास्क आणि हात धुणे ही सध्याची लस – मुख्यमंत्री

डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्या भारतात लस उपलब्ध होईल अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेली आहे. त्यामुळे लस येईपर्यंत आपल्याला असेच दिवस काढावे लागतील. लस काही एकच वेळीस सर्वाना मिळेल असे नाही त्यामुळे मास्क आणि हात धुणे ही सध्याची लस आहे असे उदगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले होते.

मुंबईनंतर आता पुण्यातही आता जम्बो कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे. पुण्यातील पहिले जम्बो हॉस्पिटलचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन झाले आहे. तर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झाले. गेल्या काही दिवसांपासून जम्बो हॉस्पिटलबाबत अनेक आरोप प्रत्यारोप झाले.

सामाजिक जनजागृती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. गाफील राहून चालणार नाही, गलथानपणा नको आहे. या कोव्हीड सेंटरचा उपयोग होऊ नये ही अपेक्षा आणि शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पुणेकरणांनी चांगल्या दर्जाचे हॉस्पिटल उभारलं त्याचा मला मोठा अभिमान आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: