दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर, राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध

मुंबई : 2018-19 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर झाला आहे. अंदाजानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत 7.5 टक्के वाढ अपेक्षित आहे, तर कृषी आणि उद्योग दरात घट अपेक्षित आहे. गेल्या वेळीही इतकाच म्हणजे 7.5 टक्क्यांनी अर्थव्यवस्था वाढण्याचा अंदाज होता. महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नात देशात तिसरा क्रमांक लागतो.

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी परिषदेत सादर केला.

मागील वर्षीच्या दुष्काळामुळे राज्यातील पीक उत्पादनात आठ टक्के घट अपेक्षित असल्याची चिंताजनक बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे. राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात 2.7 टक्क्यांची घट अपेक्षित आहे. गेल्या वर्षी कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्राचा वृद्धीदर 3.1 टक्के होता, यावर्षी तो कमी होऊन 0.4 टक्क्यांवर येईल असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

दुसरीकडे राज्याच्या उद्योग क्षेत्रातही 0.7 टक्क्यांची घट अपेक्षित आहे. सेवा क्षेत्राचा वृद्धीदर मात्र गेल्या वर्षीच्या 8.1 टक्क्यांवरुन 9.2 टक्के वाढणे अपेक्षित आहे. म्हणजेच त्यात 1.1 टक्क्यांची अल्पशी वाढ दिसून येत आहे. राज्याच्या दरडोई उत्पादनात यंदा कोणतीही वाढ झालेली नसून दरडोई उत्पादनात देशात कर्नाटक आणि तेलंगणा राज्यानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे.

कर्नाटकचे दरडोई उत्पन्न दोन लाख 7 हजार 62 रुपये, तेलंगणाचे दोन लाख 6 हजार 107 रुपये, तर महाराष्ट्राचे एक लाख 91 हजार 827 रुपये आहे. या परिस्थितीमुळे राज्याचा विकासदर 7.5 टक्के इतका राहणार असून गेल्या वर्षीही हा विकास दर 7.5 टक्केच होता.

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर
दरडोई उत्पादनात कर्नाटक, तेलंगणानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर कायम असल्याचे अहवालात नमूद

आर्थिक पाहणी अहवालात काय?

▪ मागील वर्षीच्या दुष्काळामुळे राज्यातील पीक उत्पादनात 8 टक्के घट अपेक्षित
▪ राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात 2.7 टक्क्यांची घट अपेक्षित
▪ गेल्या वर्षी कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्राचा वृद्धीदर 3.1 टक्के होता, यावर्षी तो कमी होऊन 0.4 टक्क्यांवर येईल असा अंदाज
▪ राज्याच्या उद्योग क्षेत्रातही 0.7 टक्क्यांची घट अपेक्षित आहे
▪ सेवा क्षेत्राचा वृद्धीदर मात्र गेल्या वर्षीच्या 8.1 टक्क्यांवरुन 9.2 टक्के वाढणे अपेक्षित आहे
▪ यंदाही आर्थिक पाहणी अहवालात सिंचनाची टक्केवारी उपलब्ध नसल्याचा उल्लेख आहे.

राज्याचा विकासदर 7.5 टक्के इतका राहणार असून गेल्या वर्षीही हा विकास दर 7.5 टक्केच होता.
महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नात देशात तिसरा क्रमांक – एक लाख 91 हजार 828 रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे https://www.facebook.com/globalnewsmarathi/ फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर .Log On करा
www.global newsmarathi.com
खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.

धिरज करळे: