खबर जगाची सकाळच्या हेडलाईन, राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

वृत्तसंकलन: गुरुराज माशाळ

जम्मू-काश्मीर: पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला करण्याचा प्रयत्न; 9 जवान जखमी, कोणतीही जीवीतहानी नाही.

जम्मू-काश्मीर: अनंतनाग येथे दशवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेजर केतन शर्मा यांना वीरमरण.

हिमाचल : ए एन ३२ विमान अपघात: १३ हुतात्मा जवानांचे पार्थिव वर आणण्यात खराब हवामानामुळे अडचणी; आजपुरते प्रयत्न थांबवले.

इजिप्त : इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी कोर्टात कोसळले, जागीच मृत्यू; इजिप्तच्या टेलिव्हिजन वाहिन्यांची माहिती.

नवी दिल्ली: काँग्रेसच्या संसदीय समितीची आज (मंगळवारी) यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक.

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील एकूण ४८ खासदारांपैकी ३४ खासदारांनी घेतली मराठीतून शपथ.

नवी दिल्ली: जे.पी.नड्डा भाजपचे नवे कार्यकारी अध्यक्ष; भाजपच्या संसदीय बोर्डाचा निर्णय.

कोलकाता : आठवडाभर पासून चालु असलेल्या पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप अखेर मागे घेतला; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि संपकर्ते डॉक्टर यांच्यात झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर संप मागे घेण्याची घोषणा डॉक्टरांनी केली.

बिहार: ‘चमकी’ तापाचं थैमान; मृत्यू झालेल्यांचा आकडा पोहोचला १०४ वर.

मुंबई: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी राज्याच्या अर्थसंकल्पातील तरतूदींवर चर्चा केली; राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार .

मुंबई : भारत पीएनबी घोटाळ्यामुळे सोडला नसून उपचारासाठी सोडला; आजारपणामुळे मी प्रवास करू शकत नाही. मात्र, खटल्याला उपस्थित राहण्याची इच्छा – मेहुल चोक्सी.

रत्नागिरी : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गावाकडील मालमत्ता जप्त होणार; खेड तालुक्यातील मुंबके येथील वडीलोपार्जित मालमत्तेचे मूल्यांकन सुरू.

पुणे: दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम रामराव पाटील यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात ‌सहायक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती.

धिरज करळे: