तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक संधी द्या -निरंजन भूमकर
वैराग : बार्शी तालुक्यातील सर्वांगीण विकासाच्या सेवेसाठी एकदा संधी द्या, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार निरंजन भूमकर यांनी केले. ते रस्तापूर येथे प्रचारसभेवेळी बोलत होते.
बार्शी विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा प्रचार वेग पकडू लागला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन प्रकाश भूमकर यांनी गावोगावी फिरुन प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. गुळपोळी , देव्हावं, पानगाव ह्या गावांना भेटी देऊन रस्तापूर येथे बोलताना भूमकर यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी प्रत्येक गावामध्ये पोहचणे महत्वाचे आहे. यासाठी तालुक्यातील नद्या, मध्यम प्रकल्प,लघु प्रकल्प,पाझर तलाव, को.प बंधारे असे सर्व प्रकल्प भरून घेण्यासाठी उजनीचे पाणी आणू ,असे सांगून तालुक्यात कोणतेच रस्ते सुस्थितीत नाहीत, ते दुरुस्त करुन दळणवळण सुखकर करण्याचा प्रयत्न राहील असेही त्यांनी सांगितले.
आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय उभारण्याकडे भर राहील असे ही सांगण्यास ते विसरले नाहीत. यावेळी कुमार पौळ,विक्रम साळवे, भूषण भूमकर,मौलाना आबास कादरी, सैफन शेख, युन्नस पठाण, राजाभाऊ खेंदाड, प्रशांत भालशंकर,सलिम शेख,भारत देशमुख, कैलास शेळके, शमू मुजावर, बंडू सातपुते, बालाजी घोडके, ज्ञानेश्वर पवार, संतोष हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi