बार्शी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या प्रचारार्थ नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी व युवा नेते अभिजित राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहरात पदयात्रा काढून घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला.
पदयात्रे च्या माध्यमातून आसिफ तांबोळी हे पालिकेच्या वतीने शहरात केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाची माहिती ते देत आहेत. आज जरी थोडासा त्रास होत असला तरी भविष्यात त्यामुळे शहरातील डासांचे प्रमाण कमी होऊन घर बांधताना चा खर्च वाचणार आहे.
कविताताई राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 16 मध्ये महिलांची पदयात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन राजाभाऊंच्या कार्याची माहिती देऊन बार्शी शहर व तालुक्यात केलेल्या विकास कामांचा जोखालोखा माता-भगिनी समोर मांडला. या पदयात्रेत सौ कोमलताई राऊत,सौ. शुभांगीताई राऊत,श्रीमती विद्याताई राऊत व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या सर्व पदयात्रा ना नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi