तानाजी सावंताच्या केबिनसमोर आंधळकरासोबत दिलीप सोपल , सोपलांकडूनच फोटो व्हायरल,काय म्हणायचे याला

एच सुदर्शन

बार्शी: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार दिलीप सोपल यांच्या गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आमदार सोपल व शिवसेनेचे बार्शी तालुक्याचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांचा मंत्रालयातील जलसंधारण मंत्री तथा शिवसेना उपनेते तानाजीराव सावंत यांच्या दालनासमोर एकत्रित उभे असलेला फोटो आमदार दिलीप सोपल यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंट वरून शेअर केल्याने सोपल यांच्या सेना प्रवेशाच्या चर्चेला बळकटी मिळाली आहे.

गेल्या एक महिन्यापासून सोपल शिवसेनेत प्रवेश करणार अशा प्रकारच्या पोस्ट आमदार सोपल यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. आमदार सोपल यांनी या चर्चेवर कोणतेही अधिकृत भाष्य न करता गप्प राहणे पसंत केले.महायुतीच्या जुन्या जगा वाटपात बार्शीची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आहे.

त्यामुळे सोपल हे सेनेत प्रवेश करतील असे दिसत आहे. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्कप्रमुख असलेल्या सावंत यांच्याशी सोपल यांची सलगी वाढत चालली असल्याची ही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज रात्री आमदार दिलीप सोपल यांच्या फेसबुक अकाउंट वर आंधळकर यांच्या समवेत चा फोटो व्हायरल केल्याने सोपलांच्या सेना प्रवेशासंदर्भात काहीतरी हालचाली सुरू असल्याचे दिसून येते.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: