मुंबई । अवघ्या देशाच्या इतिहासात खळबळ उडवून देणाऱ्या नाट्यमय सत्तास्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार ट्विटरवर म्हणाले की, अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. अशी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली यानंतर आता काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यात सरकार बनवण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येत होते. सरकार बनवण्याचा आकडा सर्वांकडे होता. बहुमताचाही आकडा होता. आम्हाला लक्षात आलं की अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनावर गेले आहेत. त्यानंतर काही वेळातच टीव्ही चॅनलवर त्यांनी शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र अजित पवार यांचा निर्णय पक्षाच्या विरोधात आहे. प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही असही मत त्यांनी यावेळी मांडले. 10 ते 11 सदस्य अजित पवारांसोबत आहेत, जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात तिन्ही पक्ष एकत्र काम करतील असही मत त्यांनी यावेळी मांडले.
आम्ही तिन्ही पक्षांच्या सरकारचं नेतृत्व शिवसेनेने करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत, कोणत्याही परिस्थिती आम्ही सोबत राहू. काँग्रेसचे नेतेदेखील सोबत होते. मात्र, त्यांची विधीमंडळ बैठक होती त्यासाठी ते गेले आहेत. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.