जितेंद्र आव्हाडांची जनतेला विनंती,मी चूक केली तुम्ही करू नका.

आव्हाडांची जनतेला विनंती, मी चूक केली तुम्ही करू नका
राज्याचे तथा आमदार मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना आजारावर मात करत ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहे. त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तरी देखील प्रकृती अजून काही दिवस जितेंद्र आव्हाड घरीच थांबणार आहेत. रुग्णालयातून येताचं जितेंद्र आव्हाड यांनी जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे. आपण सुरीक्षित राहा कोरोनाला गांभीर्याने घ्या. मी जी चूक केली ती तुम्ही करू नका, असे आवाहन आव्हाड यांनी राज्यातील जनतेला केले आहे.


त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून हे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, मी सुरुवातीला कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले. मात्र सुदैवानं मी यामधून वाचलो, असे आव्हाड म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेले असून मी आज सुखरूप घरी जात आहे. या पुढेही तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उस्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी सज्ज होऊया” असे ट्विट त्यांनी केले आहे.


लोकांनी कोरोनाच्या लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे, लक्षणे दिसल्यास ती गांभीर्यानं घ्यावीत, असे कळकळीचं आवाहन त्यांनी केले आहे. ‘कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यास नागरिकांनी प्रशासनाला सतर्क करावे. तातडीनं डॉक्टरांकडे जावे. तुम्ही लक्षणांकडे दुर्लक्ष केले, उपचारांना उशीर केला, तर त्याची जबर किंमत तुम्हाला मोजावी लागेल,’ असे आव्हाड पुढे म्हणाले.

admin: