ग्रीन जिल्हा उस्मानाबाद मधील परंडा तालुक्यात सापडला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण परंडा
येथे सापडला

उस्मानाबाद: जिल्ह्यातील परंडा येथे कोरोनाचा एक रुग्ण सापडला असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची
माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे
यांनी दिली.

हा रुग्ण माढा करमाळा नवी मुंबईसह वाशी
येथे खरबूज व टरबूज अशी फळे विकत होता तसेच तो
स्वतः ड्राइवर होता, हा रुग्ण सरणवाडी येथील रहिवाशी
असून त्याच्यावर उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील
उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल 37 दिवसानंतर कोरोनाचा रुग्ण
सापडला असल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.सध्या उस्मानाबाद जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये आहे. तसेच आजच जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात कोरोना येऊ न देण्याची शपथ जिल्हावासीयांनी घेतली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: