जावयाचा अतिशहाणपणा सासुरवाडीला भोवला, पत्नीसह निघाला पॉझिटिव्ह
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असलेल्या औरंगाबादेतून एक जावई आपल्या कुटुंबासह फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावात कोरोनाच्या बचावासाठी सासूरवाडीला गेला. औरंगाबादच्या बंजारा कॉलनीचा रहिवाशी असलेल्या या जावयाच्या आईचा अहवाल औरंगाबादेत पॉझिटिव्ह आला आणि आरोग्य पथकाने लगेच बाबरा गाव गाठत सासूरवाडी असलेल्या फुलंबी तालुक्यातील बाबरा या गावी गेला. दरम्यान, बंजारा कॉलनीत रूग्ण आढळतील या कुटूंबाच्या आईचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आणि आरोग्य पथकाने लगेच बाबरा गाठत या कुटुंबाला रविवारी ताब्यात घेतले.
त्यांची तपासणी केली असता पती-पत्नी आणि दोन मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाबरा गावात एकच खळबळ माजली. आता त्यांच्या संपर्कातील २१ जणांना विलगीकरण कक्षात हलवण्यात आले असून अनेकांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.
फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील रहिवासी असलेला एक शासकीय रुग्णवाहिकेचा चालक लॉकडाऊन काळात रूग्ण किंवा औषधी आणण्यासाठी औरंगाबाद ते बाबरा ये जा करत आहे. याच गावात त्याची बाजूच्या वस्तीत त्यांची सासुरवाडी आहे. या चालकाचा साडू अर्थातच सालीचा नवरा शहरात बंजारा कॉलनी बहादूरपुरा येथे राहतो. बंजारा कॉलनीत कोरोना रूग्ण आढळल्याने घराघरातील व्यक्तींची तपासणी करण्यात येत असून अनेकांचे स्वॅबही तपासणीसाठी घेतले आहे.
त्यातच या साडूच्या आईचाही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला. यानंतर या साली व साडूला रूग्णवाहिकाचालक बाबरा गावी घेऊन गेला. लेक-जावई ९ मे रोजी बाबरा गावात दाखल झाल्यापासून कुटुंबासह सासुरवाडीत पाहुणचार घेत होता.
दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य पथकाने या कुटुंबाची हिस्ट्री तपासली असता त्यांना होम क्वारंटाइनचा सल्ला दिलेला होता. असे असतानाही ते घर सोडून बाहेरगावी गेल्याचे समोर आहे. याच साडूच्या आईचा १४ मे रोजी घेतलेला स्वॅब १६ मे रोजी पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला.
तोच महापालिकेच्या आरोग्य पथकाने मुलगा-सून व नातवांचा शोध घेत बाबरा गाठले. पथक गावात जाताच ही बातमी वार्यासारखी गावात पसरली आणि गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान, होम क्वॉरंटाइन केले असतानाही औरंगाबाद येथून आलेल्या या जावयाने प्रशासनापासून माहिती लपवली म्हणून त्याच्याविरूध्द वडोद बाजार पोलिसांत गुन्हाही दाखल केला आहे, अशी माहिती बाबरा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली.