जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे पुन्हा उघडले, 35 हजार क्यूसेक विसर्ग सुरू

औरंगाबाद | पैठण जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्र व नासिक जिल्ह्यातील पावसाचे पाणी कमी अधिक प्रमाणे धरणात दाखल होत आहे. गुरुवारी सकाळी धरणाचे 16 दरवाजे दोन फुट वर उचलुन 35 हजार क्यूसेक याप्रमाणे गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

सध्या धरणात वरच्या धरणातुन 54 हजार क्यूसेक यावेगाने पाण्याची आवक सुरू आहे. दुपार नंतर पाण्याचा वेग पुन्हा वाढणार आहे. यानंतर धरणाचे सर्व दरवाजे उघण्याची वेळ येऊ शकते असे धरण उप अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. विसर्गात वाढ केल्याने गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.

22 सप्टेंबर सोमवारी बंद केलेले धरणाचे दरवाजे आज बुधवारी रात्री पुन्हा उघडण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे सात वाजता धरणाचे 16 दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले असुन एकुण धरणातुन गोदावरी नदीच्या पात्रात 35 हजार 500 विसर्ग केला जात आहे. सध्या धरण 100 टक्के भरले असून यावर्षी धरणातून तिसऱ्यांदा पाणी सोडले जात आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: