सासवड येथून पुणे-पंढरपूर मार्गावरील वाहतूक बंद, मुसळधार पावसाने रस्ता खचला

सासवडजवळ असलेल्या नारायणपूर व परिसरात रात्री ढगफुटी होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.

पुणे | जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नारायणपूर गावात बुधवारी रात्री ढगफुटी झाल्याने कऱ्हा नदीला मोठा पूर आला आहे. यामुळे पुणे पंढरपूर महामार्गावरील सासवड येथील कऱ्हा नदीवरील पूल खचला. पुणे पंढरपूर मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

यामध्ये सासवड -कुंभारवळण- बेलसर मार्गे जेजुरी असा हा मार्गवळवण्यात आला आहे. मात्र या मार्गावरून अतिजड वाहनांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

सासवडजवळ असलेल्या नारायणपूर व परिसरात रात्री ढगफुटी होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे कऱ्हा नदीला मोठा पूर आला.

कऱ्हा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. काऱ्हा नदीवरील असलेल्या नाझरे धरणातून रात्री नव्वद हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत होते. तर आता सत्तर हजार क्युसेक्स वेगाने पाणी काऱ्हा पत्रात सोडण्यात येत आहे.

त्यामुळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाने रात्रीच लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अचानक झालेल्या पावसाने लोकांच्या शेती व वाहनांचे नुकसान झाले आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: