जाणून घ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा खंबीर आधार कै. मधुकर मोहिते दादा यांच्याविषयी

हर्षल बागल

कर्मवीर जगदाळे मामांच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा खंबिर आधार श्री मधुकर मोहिते दादा काळाच्या पडद्याआड गेले.

 बार्शी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी कष्टातुन ऊभारलेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यात ज्यांचा महत्वाचा व मोलाचा वाटा असणारे श्री मधुकर मोहिते दादा यांचे वृध्दापकाळामुळे निधन झाले. 

   मोहिते दादा यांच्या जिवनाचा आढावा घेतला असता संपुर्ण आयुष्य हे केवळ आणी केवळ श्री शिवाजी शिक्षण संस्था तसेच शेतकरी कामगार वर्गाच्या हितासाठी वाहुन घेतलेले दिसते . 

आ. मोहिते दादांचा १० डिसेंबर १९२८ रोजी जन्म झाला. एैन तारुण्यांत त्यांनी स्वातंत्र्य संग्राम तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामांच्या विरुध्द होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्याचं काम केलं . स्वातंत्र्य लढ्यात देखील सहभाग असल्याची माहिती त्यांच्या वरिष्ट सहकारी मित्रांनी दिली.

 श्री शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या सदस्य पदी मोहिते दादा यांचे वडिल बाबुराव ग्यानबा मोहिते हे संस्थापक सदस्य म्हणुन कर्मवीर मामांच्या खांद्याला खांदा लावुन होते. आपल्या वडिलांचा ज्ञानसेवेचा वसा व वारसा मोहिते दादा यांनी त्यांच्या पाश्चात सुरु ठेवला . संस्थेच्या सदस्य पदी आल्यानंतर मोहिते दादांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विकासकार्यात इंचभर देखील मागे वळुन पाहिले नाही.  जनरल सेक्रेटरी म्हणुन  १९८६ ते २००१ या प्रदिर्घ काळात श्री मोहिते दादा यांनी काम पाहिले.  

तसेच २००३ ते २००६ या काळात संस्थेचे अध्यक्ष पदाची धुरा खंबिर व गंभिरपणे यशस्वी रित्या अगदी निस्वार्थापणे संभाळली. त्यांच्या कार्यकाळात संस्थेला अनेकांनी केवळ मोहिते यांच्या शब्दावर मोक्याच्या ठिकाणच्या जमिनी संस्थेच्या इमारती बांधण्यासाठी दिल्या. मोहिते यांच्या कार्य काळात संस्थेने एकुण १४ विविध इमारती बांधल्या त्यांच्या कार्यकाळात अनेक शेतकरी पुत्रांना संस्थेत नौकरी निर्माण करुन अनेकांच्या चुली पेटवण्याचं काम केले .

तसेच बार्शी अर्बन को.आँ क्रेडिट सोसायटिचे व्यवस्थापक म्हणन सन १९५२ ते २०१४ असा एैतिहासिक काळ त्यांनी कार्य केले . शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी केवळ २५ रुपये मध्ये मोहिते दादा यांनी बार्शी अर्बन को आँ क्रेडिट सोसायटी स्थापन केली हाजारो शेतकरी कामगार यांना याचा फायदा आज झाला आहे. संस्थेच्या अनेक कर्मचारीवर्गाला पगारी करण्यासाठी या सोसायटीने अनेकवेळा एक पाय पुढे टाकले आहे. अशी माहिती निवृत्त शिक्षक आवर्जुन सांगतात.

सोसायटीचे रुपांतर बँन्केत करा असा राष्ट्रीयकृत बँन्कांनी आग्रह केला पण मोहिते दादांनी शेतकरी नजरेसमोर ठेवल्यामुळे सोसायटीचे रुपांतर बँन्केंत होऊ दिले नाही. धान्य गोळा करुन मामांच्या हातात मोहिते दादा यांनी सातत्याने दिले . सकाळी पहाटे लवकर ऊठुन मोहिते दादा शेतात जायचे त्यानंतर संस्थेच्या कार्यालयातील सर्व व्यावहार व लेखनकार्य हे मामांनी मोहिते दादां यांच्या जबाबदारी टाकली होती ती यशस्वी काटेकोर पण बजावली देखील .
संस्थेच्या कारभारात तेज नजर होती .

दादा संस्थेच्या कार्यालयात बसले असता समोर अनेक जण यायला देखील घाबरत होती पण हे घाबरणे मानसन्मानाचे होते. स्वच्छ कारभार करणे हा पहिला हेतु दादांचा नेहमी होता तो यशस्वी देखील केला .

  मला बार्शीतील जेष्ठ नागरिक सांगत होते की मामा हयातीत असताना दिवंगत सावता माळी यांची २० एकर जागा संस्थेला नवी ईमारत बांधण्यासाठी पाहिजे होती . संस्था हिमालयाप्रमाणे वाढत होती सह्याद्री प्रमाणे संस्था बुलुंद दिसत होती . संस्थेच्या गुणवत्तेचा डंका राज्यभर पसरला होता पण संस्थेला जागा अपुरी पडत होती . 

मामांच्या नजरेत वीस एकर जागा होती पण काही समाजकंटक ती जागा मामांना मिळुन देत नव्हते . अशा वेळी मोहिते दादा यांनी मध्यस्थी केली अन महिते दादांच्या मध्यस्थी मुळे सावता माळी या व्यक्तीने ती जागा संस्थेला अल्पदरात दिली.

 संस्थेत काही जनावरे संभाळली जात होती यामध्ये गायी म्हशी बैल वासरे होती पण जनावरे वाढत गेली जागा पुन्हा कमी पडु लागली . मामा एकेदिवशी असाच विचार करित बसले असता मोहिते दादांनी विचारले की मामा कसला विचार करता ...काय अडचण आहे . 

मामा हळु आवाजात बोलले आपल्याला जनावरांच्या गोठ्यासाठी जागा पाहिजे …संस्थेच्या शेतीकार्यासाठी देखील जागा पाहिजे याच विचारात होतो , विद्यार्थ्यांना खाण्यासाठी शेतीत पिकवुन धान्य पिकवता येईल … मोहिते दादा यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच म्हणाले की मामा माझी 9 एकर जागा मी बक्षिसपत्र म्हणुन देतो.

त्यात आपण बिंदास्त शेती करा पिकवा व विद्यार्थ्यांना धान्य ऊपलब्ध करु मी तुमच्या सोबत आहे. कर्मवीरांच्या पाठिशी खंबिर ऱाहुन संस्थेला ऊंच शिखरावर घेऊन जाणारा ज्ञानदानातील एक महामेरु आज सकाळी काळाच्या पडद्या आड झाला यावर अजुन विश्वास बसत नाही. कर्मवीर मामांना अखेरच्या वेळी अगदी घास भरवण्याचं काम मोहिते दादांनी केल्याचे संस्थेचे माजी दिवंगत प्राचार्य मधुकर फरताडे सरांनी मला संत तुकाराम सभागृहात एका कार्यक्रमात आवर्जुन सागिंतले होते .

   कर्मवीर जगदाळे  मामा , श्री मधुकर दादा मोहिते ,  प्राचार्य मधुकर फरताडे सर यांची ऊणीव संस्थेला कायम जाणवत राहिल हे मात्र नक्की आहे. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देताना डाँ बी वाय यादव तसेच आ दिलीप सोपल यांनी त्यांच्या कार्याच्या आठवनींना ऊजाळा दिला आहे . यांनी ज्या दाविल्या वाटा त्यावर संस्था प्रगती करित आहे ....हे अभिमानास्पद आहे 

संस्थेत घडलेला हरएक विद्यार्थी आज यांचे नाव जेवना आधी घेतल्याशिवाय राहत नाही यापेक्षा मोठं यांच दातृत्वं काय असेल यांच्या कार्याला एक सामाजिक कार्यकर्ता महापुरषांचा वैचारिक वारसदार म्हणुन माझा यांना ग्रँण्ड सँल्युट .

                        जय कर्मवीर
                       हर्षल बागल कुर्डुवाडी
ग्लोबल न्युज नेटवर्क: