जाणून घ्या दही खाण्याचे फायदे

जेवणात रोज दही खाणं आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधी दही खाणं हा उपाय उत्तम आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात मीठ टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने सौंदर्याला मोठा फायदा होईल……

ताप………..
तापेमध्ये तोंड कडू पडते. काहीही खाल्ले तरी त्याची चव लागत नाही. अशावेळी दही-भात खाणे फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यामधील रोगप्रतिकारक तत्त्व आणि अँटीऑक्सीडेंट्स तापेचा प्रतिकार करण्यात फायदेशीर असते. तोंड आल्यास दह्याचा वापर दिवसातून दोन ते तीन वेळा करावा.

प्रोटीन, कॅल्शियम व विटॅमिनचा खजिना….
दह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या प्रोटीन, कॅल्शियम व विटॅमिनमुळे आरोग्य व सौंदर्य टिकवण्यात हे उपयोगी आहे. दह्यात कॅल्शियम असते ज्यामुळे हाडांना मजबूती मिळते.

बध्दकोष्ठता व पोटाची समस्या…..
दह्यामधील गुड बॅक्टेरिया पोटाचे कार्य सुधारण्यात मदत करतात. तसेस दह्यामध्ये पाणी असल्यामुळे बध्दकोष्ठतेची समस्या होत नाही. अपचन किंवा पित्त असल्यास जेवणात दही-भात खाणे फायदेशीर असते. भात पचण्यास सोपा असतो. यामुळे वेदना आणि त्रास होत नाही. दह्यामुळे पचनशक्ती चांगली होते. ज्यांना भूक कमी लागते त्यांनी दह्याचे नियमित सेवन करावे.

हृदयरोगावरही आहे गुणकारी……
दह्यात हृदयरोग, उच्च रक्तदाब व फुफ्फुसाचे आजार थांबवण्याची क्षमता आहे. रात्री झोप येत नसल्यास दररोज दह्याचे सेवन करा. झोपेची समस्या हळू हळू कमी होईल.

आतड्यांचे रोग…….
अमेरिकी आहारतज्ञांच्या मते दह्याच्या नियमित सेवनाने आतड्यांचे रोग व पोटासंबंधित आजार बरे होतात. दह्याचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. दह्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता तसेच थकवा दूर होतो.

वजन कमी…….
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आपल्या आहारात दही-भात खाणे आवश्यक आहे. परंतु दोन्ही वेळी दही भात खाऊ नये. मर्यादित प्रमाणातच याचे सेवन करावे. वजन वाढवायचे असल्यास दह्यात बदाम, बेदाणे मिसळून खाल्ल्यास फायदा होतो.

तणाव……..
दही खाल्ल्याने ताण कमी होण्यासही मदत होते. त्यामधील प्रोबायोटीक बॅक्टेरिया आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स, चांगले फॅट्स फायदेशीर ठरतात. दह्यामुळे मूड सुधारण्यास मदत होते.

पोट ‘भरल्याचे’ समाधान टिकून राहते…
दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घ काळ पर्यंत टिकून राहते. म्हणून दोन जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

भरपूर प्रथिनांनी युक्त आहार……
दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कॅल्शियम आहे जे शरीरात सहज शोषले जाते आणि शरीराची गरज भागते.

ऊर्जेने युक्त आहार…..
दही खाल्ल्याने भरपूर ऊर्जा त्वरित मिळते आणि धकाधकीनंतरचा थकवा त्वरित निघून जातो. दही आणि साखर खाल्ल्याने काम शक्ती वाढते. नपुंसकत्व कमी होण्यास मदत होते.पुरुष बीजांची संख्या आणि गुणवत्ता सुधारते.

प्रतिकारशक्ती वाढते……
दही खाल्ल्याने शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पेशी कार्यरत होऊन शरीरातील संरक्षक यंत्रणा बळकट बनते. त्यामुळे विषाणूंचा नायनाट होऊन संसर्गजन्य आजार होत नाहीत. दातातील कीड नाहीशी होते.

मधुमेह नियंत्रित राहतो….
दह्यामुळे रक्तशर्करेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारी गुप्तागांची खाज कमी होते.

पचन क्रिया सुधारते…..
दही पचायला हलके आहेच. तसेच दह्यामुळे जठरातील आणि आंतड्यातील पाचक रस स्त्रवण्यास मदत होते, जेणेकरून जड अन्न देखील सहज पचते. खूप तिखट, तेलकट, मसालेदार, चमचमीत जेवणासोबत दही खाल्ल्यास असा आहार बाधत नाही.

हृदय विकाराची शक्यता कमी होते……
दह्यामध्ये रक्तातील चरबी घटवण्याची क्षमता आहे. त्यामुळे विविध हृदय विकारांची शक्यता कमी होते. रक्त दाब नियंत्रित राहतो.

जीवनसत्वानी परिपूर्ण……
विटॅमिन बी ५, बी १२ सारख्या जीवन सत्वानी परिपूर्ण असलेने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि मज्जा संस्था निरोगी राहते. कॅल्शियम आणि जीवनसत्व ‘ड‘ मुळे दात आणि हाडे बळकट होतात. मणक्याचे आरोग्य सुधारते.

आतड्यांचे आरोग्य सुधारते…..
लॅक्टो बॅक्टेरीया सारखे आतड्यांच्या आरोग्यास पोषक जीवाणू दह्यात असल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते, आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. पोट नियमित साफ होते.

चेहरा,त्वचा उजळते…..
चेहऱ्यावर,त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत पंधरा मिनिटे दही वापरल्याने मृत आणि रापलेली त्वचा निघून जाते. कांती उजळ बनते. संत्र्याच्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो. गुलाब पाणी आणि हळदी सोबत दही लावल्याने त्वचा उजळ आणि मुलायम बनते. लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील,चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

केसांसाठी उपयुक्त……
तीस मिनिटांपर्यंत केसांना दही लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुतल्यास केस मऊ आणि रेशमी बनतात. मेंदी सोबत लावल्यास परिणाम आणखी वाढतो. दह्यातून काळी मिरी पावडर आठवड्यातून दोनदा केसांना लावल्यास केसातील कोंडा नाहीसा होतो. केसांच्या मुळांना दही आणि बेसन लावल्याने केस गळती कमी होते.

मानसिक स्वास्थ्यासाठी……
दह्याचा वापर आहारात सातत्याने केल्याने मेंदूतील सकारात्मकता वाढवणाऱ्या पेशीमधील रासायनिक प्रक्रिया वाढीस लागून चिंता, नकारात्मक विचार आणि औदासिन्य कमी होऊन मानसिक स्वास्थ्य टिकून राहणेस मदत होते हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.

हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका………
सोर्स – गुगल…..

admin: