छत्रपती उदयनराजे येणार तुळजाभवानी आणि विठ्ठलाच्या दरबारात….

ग्लोबल न्यूज नेटवर्क: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उदयनराजे हे महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन भेटी देत असल्याचं दिसतंय. नुकतेच ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी रायगडावर उपस्थिती लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दुष्काळी दौऱ्यातदेखील अनेक ठिकाणी ते उपस्थित होते.

यावर्षी महाराष्ट्रातील जनता मोठ्या दुष्काळाला सामोरं गेली. जुन महिना चालू असला तरी अजून बळीराजाला पावसाची आस आहे. संकटाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज खा.छ.उदयनराजे भोसले महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीला साकडं घालणार आहेत. यासाठी येत्या १४ तारखेला त्यांचा तुळजापुर दौरा ठरला आहे.

हे दौरे राजकीय नसले तरीही यावरून आगामी काळात उदयनराजे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय होणार का? व लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उदयनराजेंना प्रमोट करत आहे का? याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अगदी काल झालेल्या शरद पवारांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये अनेकांनी उदयनराजेंना राष्ट्रवादीकडुन मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषीत करावा अशी मागणी केली. छत्रपती उदयनराजेंची राज्यातील लोकप्रियता पाहता अशी शक्यता नाकारता येत नाही. मात्र प्रत्यक्षात ते कितपत खरे ठरेल हे बघणं औत्सुक्याचं ठरेल.

उदयनराजे छञपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आहेत. खासदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आलेले राजे हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी महाराष्ट्रभर प्रसिध्द आहेत.महाराष्ट्रभर तरुणांमध्ये त्यांची भरपूर क्रेझ आहे. शिरूर लोकसभेमध्ये फक्त एका महिन्यात छत्रपतींची भूमिका सादर करणाऱ्या कलावंतास निवडून दिले, हे पाहता साक्षात शिवछत्रपतींचे वंशजच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसला नक्कीच फायदा होईल, असा एक अंदाज पवार यांना वाटत असावा.

कारण महाराष्ट्रात असा एक वर्ग आहे जो फक्त छत्रपतींना मत म्हणू6न राष्ट्रवादीला मतदान करेल आणि त्याप्रमाणे उदयनराजे भोसले यांची वाटचालही त्या दिशेने सुरु झालेली आहे. कधीही सातारा लोकसभेच्या बाहेर पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी न लावणारे उदयनराजे लोकसभा निवडणुकीनंतर कटाक्षाने पक्षाच्या कार्यक्रमाला जात आहेत. नुकतीच त्यांनी मराठवाड्यातील दुष्काळी भागालाही भेट दिली.

धिरज करळे: