तिहेरी तलाक विरोधी विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी,खबर जगाची सकाळच्या हेडलाईन

गुरुराज माशाळ*

जम्मू काश्मीरः अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका आतंकवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश; सीआरपीएफचे 5 जवान शहीद; 2 जण जखमी.

नवी दिल्ली : तिहेरी तलाक विरोधी विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; आगामी अधिवेशनात लोकसभेत विधेयक मांडण्यात येणार – प्रकाश जावडेकर.

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत ६ महिन्यांची वाढ; प्रकाश जावडेकर.

गुजरातः वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातकडे जाणाऱ्या ४० गाड्या रद्द; तर २८ गाड्यांचे मार्ग बदलले, पश्चिम रेल्वेची माहिती.

मुंबईः चर्चगेट स्टेशनवर होर्डिंग कोसळून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना पश्चिम रेल्वेकडून ५ लाखांची मदत जाहीर.

पुणे : पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार; वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारकडून एक्स्प्रेस वेच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात,विस्तारीकरणामुळे मुंबई-पुणे यांमधील अंतर जवळपास 6 किलोमीटरने कमी होणार.

पुणे : दहावी-बारावीसाठी जुलै-ऑगस्ट 2019 पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, एसएससी परीक्षा 17 जुलै 2019 ते 31 जुलै 2019, तर एचएससी परीक्षा 17 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान होणार.

अहमदनगर : अहमदनगर शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेमधील खाते हॅक करून सुमारे ४५ लाख रुपये परस्पर दुसऱ्या बँक खात्यांवर वर्ग.

नाशिकः खासगी क्लासेस मध्ये अग्निशमन प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्या प्रकरणी अग्निशमन विभागाकडून ८३ क्लास चालकांना कारणे दाखवा नोटिस.

सोलापूर : नीरा-डाव्या धरणातून बारामती व इंदापूरला नियमबाह्य पाणी कायमस्वरूपी बंद; 12 वर्षाचा पाप 12 दिवसात धुवून गेल्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा टोला, शरद पवारांना मोठा धक्का.

सोलापूर : सोलापुरातील बेपत्ता वकिलाचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत आढळला; बेपत्ता असलेल्या वकिलाची शोध सुरु असताना मृतदेहाच्या तुकड्यांनी भरलेलं पोत आढळल्याने शहरात खळबळ.

इंग्लंड : टाँटनमधील मैदानात ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर 41 धावांनी विजय, 308 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 266 धावांवर बाद.

धिरज करळे: