चड्डीच्या सपोर्टवर मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाला होता हे विसरू नका-देवेंद्र फडणवीस

कुर्डुवाडी: शरद पवारांचा तोल सुटत चालला आहे ते चड्डी आणि मांडीवर आले, इथे तर फुल पॅन्ट आहे हे तुम्ही विसरला काय तुम्हीच या चड्डीच्या सपोर्ट वर मुख्यमंत्री झाला होता हे विसरू नका असे प्रत्युत्तर अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या टीकेला दिलं.
भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ ते कुर्डुवाडी येथे बोलत होते

ही निवडणूक विकासाची व राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक आहे मजबूत देश आहे हे सांगण्याची निवडणूक आहे असे सांगत पुलवामा हल्ल्याचा पुरावे मागणाऱ्या काँग्रेसवर ही त्यांनी टीका केली भारत हा पाकिस्तानशी चर्चा करणार नाही तर नादी लागनाऱ्यांना ठोकणारा देश आहे .राहुल गांधींच्या पंजोबा आई-वडील आजी यांना सत्ता दिली गरिबी हटवू शकले नाहीत गेल्या पन्नास वर्षात त्यांनी भ्रष्टाचाराची मालिका दिली आणि मोदींनी मात्र अवघ्या पाच वर्षात सामान्यांच्या जीवनात परिवर्तन करीत पारदर्शी प्रामाणिक शासन दिले व जगासमोर भारताला मजबूत देश बनवला असेही फडणवीस म्हणाले.येत्या 23 मे ला कुणाची चड्डी उतरते हे ही कळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

admin: