सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या झाली 275 तर मृत संख्या 17 ;आज 12 ची वाढ

सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या झाली 275 तर मृत संख्या 17 ;आज 12 ची वाढ

सोलापूर- सोलापूरातील कोरोनाबाधितांची संख्या आज 11 नं वाढून 275 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या 17 पर्यंत पोहोचली आहे. जिल्हाप्रशासनानं आज दि. 11 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता हि माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

आत्तापर्यंत सोलापूरात 3200 जणांचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले. यातील 3098 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2823 निगेटिव्ह तर 275 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

आज एका दिवसात 126 अहवाल प्राप्त झाले यापैकी 115 निगेटिव्ह तर 11 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यात 6 पुरूष, 5 महिलांचा समावेश आहे.

आज जे रूग्ण मिळाले त्यात एकता नगर, महालक्ष्मी नगर एमआयडीसी, सदर बझार लष्कर, बुधवार पेठ, हुडको कॉलनी, प्रत्येकी 1 महिला,

तर किसान संकुल सूत गिरणीजवळ अ.कोट रोड, जवाहर नगर, पाच्छा पेठ, मिलिंद नगर, कुमठा नाका, रंगभवन येथे प्रत्येकी 1 पुरूष.

आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांची संख्या 275 आहे. यात 158 पुरूष तर 117 महिला आहेत. 17 मृतांपैकी 8 पुरूष, 9 महिला आहेत.

आत्तापर्यंत बरे झालेल्या 41 जणांची रूग्णालयातून सुटका झाली आहे.

आज एकूण 3 मृतांपैकी जवाहरनगर परिसरातील 50 वर्षीय पुरूष दि. 9 रोजी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. 9 मेला सायंकाळी मृत पावला. दुसरी व्यक्ती सदर बझार लष्कर परिसरातील 46 वर्षीय महिला असून ती 8 मे रोजी सिव्हीलमध्ये दाखल झाली होती दि. 9 रोजी सकाळी मृत पावली. तिसरी व्यक्ती पाच्छा पेठ भागातील 68 वर्षीय पुरूष असून 9 मे रोजी सिव्हीलमध्ये दाखल झाली होती दि. 10 मे रोजी सकाळी मृत पावली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: