गोपीनाथ गडावरील ती खबळजनक रांगोळी चर्चेत, धनुष्यबाणाच्या निशाण्यावर ..!

बीड | विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. महायुतीला जनादेश मिळाला. तरीही सत्ता स्थापनेस उशीर होत आहे. शिवसेना आपल्या 50-50 फॉर्म्यूल्यावर ठाम आहे. मुख्यमंत्री पदबाबत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र भाजप पद द्यायला तयार नाही. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी बीडमध्ये आहेत. त्यांनी परळी येथील गोपीनाथ गडावर दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. त्यांच्या स्वागतासाठी गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवर रांगोळी काढण्यात आली आहे. रांगोळीमध्ये धनुष्यबाणाच्या निशाण्यावर कमळ अशी रांगोळी आहे. तसेच आठवणीत साहेबांची असा मजकूर लिहिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेमध्ये गोंधळ सुरू आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवरील या रांगोळीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. फुलांच्या रांगोळीच्या बाजुला ‘आठवण साहेबांची’ असे लिहिले आहे. दरम्यान शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा संघर्ष सतत वाढत आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडत आहेत. भाजपने अद्यापही शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा केलेली नाही. राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होण्याच्या दिशेने सर्व पक्षीयांची वाटचाल सुरू आहे. कारण येत्या 8 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. यानंतर नवीन विधानसभा अस्तित्वात येणार आहे. सत्तास्थापनेबाबत भाजप-शिवसेनेत तोडगा निघाला नाही तर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: