गोदावरी काठच्या गावातील नागरिकांच्या मदतीला प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी

औरंगाबाद : राज्य सुरक्षा बल, एनडिआरएफची टिम, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी गोदावरी काठातील गावातील लोकांना सुखरुप काढण्यासाठी परिश्रम घेत आहे. गेली 5 दिवसापासून नाशिक परिसरात पावसाने लावून धरली आहे. नागमठाण नांदूर- मधमेश्वर चा प्रकल्प तुडुंब भरल्याने, नागमठाण प्रकल्पातून आणि नांदूर- मधमेश्वर कालव्यातून जायकवाडीकडे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पात येणार पाण्याची आवक वाढली आहे.

गोदाकाठच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मदतकार्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तर गंगापूर व वैजापूर तालूक्यातील लोकांसाठी मदतकार्य सुरु आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गंगापूर, वैजापूर तालूक्यातील आढावा दौऱ्यावर असताना दिली. सकाळी ६ वाजेपासून ते गोदाकाठावरील गावांतील बचावकार्याचा आढावा घेत आहेत. सध्या आवक ९६३५६ क्युसेकने सुरु आहे. जायकवाडी तलावात २३.२१ टक्के जलसाठा सध्या झालेला आहे.
सुरक्षाबलच्या टिमने आतापर्यंत ५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. गंगापूर तालुक्यातील नदीकाठातील २९ कुटुंब व १४३ व्यक्तींचे स्थलांतर जवळच्या वस्तीशाळा व शाळेत राहण्याची सोय केली आहे. एनडिआरएफचे ३ टिम, मंडळ अधिकारी, १० तलाठी, १० कोतवाल, १० पोलीस पाटील, बचाओ पथकाचे खाजगी ३० व्यक्ती व पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आतापर्यंत कोणतीही दुर्दैवी घटना घडलेली नाही.

ग्लोबल न्युज नेटवर्क: