आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहांची राज्यसभेत थोपटली पाठ

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-कश्मीरला 370 कलम रद्द करून विभाजन करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडला. यावर राज्यसभेत सोमवारी दीर्घ चर्चा झाली. विरोधकांनी कश्मीरच्या विभाजनावर मतविभागणीची मागणी केल्याने राज्यसभेत चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 125 मतं, तर विरोधात 61 मतं पडली. विधेयक मंजूर झाल्यानंतर अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जात हात जोडून नमस्कार केला. यानंतर मोदींनी अमित शहा यांचे अभिनंदन केले आणि त्यांची पाठ थोपटली.

सकाळी 370 कलम रद्द करण्याची शिफारस केल्यानंतर दुपारी अमित शहा यांनी राज्यसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. जम्मू-कश्मीरला विषेष अधिकारी देणारे कलम 370 रद्द करण्याच्या प्रस्तावावर भाजप व्होटबँकेचे राजकारण करत असल्याची टीका करण्यात येत होती. विरेधकांच्या प्रत्येक आरोपांना शहा यांनी उत्तरं दिली. यावेळी त्यांनी 370 कलम रद्द केल्यास दहशतवाद संपेल आणि आम्ही 5 वर्षात जम्मू-कश्मीर विकसित राज्य करू असा दावाही केला.

तसेच कश्मीरमध्ये केवळ मुस्लिमच राहतात का? कश्मीरमध्ये मुस्लिम, हिंदू, शीख, जैन, वौद्धही राहतात. जर 370 कलम चांगले असेल तर ते सर्वांसाठी चांगले आणि जर वाईट असेल तर सर्वांसाठी वाईटच असणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: