खासदार सुप्रिया सुळे विधानभवनाच्या गेटवर स्वागताला, सर्वपक्षीय आमदारांचं स्वागत, आदित्य ठाकरें सह अजितदादांची गळाभेट

मुंबई । राज्यपाल यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 174 अन्वये त्यांना प्रदान केलेले अधिकार वापरून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बुधवार, दि. 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता विधान भवन, मुंबई येथे भरविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आमदार विधानभवनवर येत आहेत.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे विधानभवनाच्या गेटवर स्वागताला आल्या आहेत, सर्वपक्षीय आमदारांचं स्वागत, आदित्य ठाकरे यांची गळाभेट घेतली. तसेच धनंजय मुंडेही सोबत अजित पवारही विधानभवनात दाखल झाले आहेत.सुळे यांनी अजितदादांची ही गळा भेट घेतली. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रोहित पवार, ऋतुराज पाटील, संदीप क्षीरसागर आदी तरुण आमदारांचे ही त्यांनी स्वागत केले. अनेक युवा आमदारांनी त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद ही घेतले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: