कोरोना व्हायरस; राज्यातील 11 हजार कैद्यांना मिळणार तात्पुरता जामीन; गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग हाच एकमेव पर्याय आहे. त्यानुसार राज्य गृहखात्याने यादृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल 11 हजार कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे आता संबंधित कैद्यांना घरी जाता येणार आहे.

देशमुख यांनी दिलेल्या आदेशात सात वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील 60 तुरूंगांतील जवळपास 11 हजार कैद्यांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील आठवड्याभरात यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात मागील आठवड्यात कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: