कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उद्योगपतींची साथ, या उद्योगपतींनी केली 100 कोटींची मदत

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 400 पर्यंत पोहोचली आहे. अशा भयंकर आजाराला रोखण्यासाठी देशातल्या सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. अशा परिस्थितीत उद्योगपतींनीही मदतीचा हात पुढे केला आहे. हिंदुस्थानातील उद्योग क्षेत्रातील अनेक बड्या हस्तींनी पुढे येऊन कोट्यवधींच्या मदतीची सुरुवात केली आहे.

या कार्याचा श्रीगणेशा केला तो महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनी. त्यांनी ट्विटरवरून आपला संपूर्ण पगार कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील निधीला देण्याचं जाहीर केलं आहे. तसंच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही पगार देण्याचं आवाहन केलं आहे. यापुढेही ते अजून काही घोषणा करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

महिंद्रा यांच्या घोषणेनंतर आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आणि पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी मदतीचे घोषणा केली आहे. अनिल अग्रवाल यांनी करोनापासून बचाव करण्यासाठी 100 कोटींचा मदतनिधी देत असल्याची घोषणा केली तर पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांनी करोनाच्या लसीवरील संशोधकानासाठी 5 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

अनिल अग्रवाल यांनी ट्विटवरून करोनासाठी मदत करणार असल्याची घोषणा केली. “मी कोरोनाविरोधातील लढ्यासाठी 100 कोटी रुपये देण्याचे वचन देतो. आम्ही देशाला दिलेल्या वचनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत आहोत. यावेळी देशाला आमची सर्वात जास्त गरज आहे. अनेक लोक भविष्याबद्दल संभ्रमात आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी मी जास्त चिंतेत आहे. आम्ही आमच्यामार्फत मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत,” असं अग्रवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: