कै. चंद्रकांत नानांची सर्व अधुरी स्वप्ने पूर्ण करणार- राजेंद्र राऊत 

बार्शी:   मला बार्शी तालुक्यात हरित क्रांती घडवून तालुका सुजलाम सुफलाम बनवायचा आहे,तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत शेतीला व पिण्याला पाणी मिळवण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केले

ते शेळगाव आर येथील प्रचार सभेत  बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले,नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी,अनिल काका डिसले,डॉ.कपिल कोरके,बाबासाहेब कथले, प्रकाश मनगिरे,सुभाष लोढा, वासुदेव बापू गायकवाड, बाबासाहेब गायकवाड,भारत पवार सर, डॉ.भारत पंके व शेळगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   वैराग भागातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे आदरणीय कै.चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या स्वप्नातील वैराग भाग सुजलाम-सुफलाम बनविण्यासाठी कटिबद्ध असून कै.चंद्रकांत नाना निंबाळकरांच्या आदर्शावर व विचारावर चालणारा मी त्यांचा कार्यकर्ता आहे.कै. नानांचे अपुरे स्वप्न मी पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

   बार्शी तालुक्याचे माजी लोकप्रतिनिधींनी वैराग भाग विकासापासून जाणून-बुजून वंचित ठेवून भकास केला. संतनाथ साखर कारखाना बंद पाडून या भागातील शेतकऱ्यांचे व त्यावर अवलंबून असलेल्या अनेक कुटूंबांचे अतोनात नुकसान केले.संतनाथ कारखाना बंद पाडण्यास जबाबदार असणाऱ्या या माजी लोकप्रतिनिधींना विधानसभा निवडणुकीत जागा दाखवून त्यांचा पराभव करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. संतनाथ कारखाना बंद पाडून वैराग भागाचे अर्थकारण संपवून,या भागाचे अतोनात नुकसान तालुक्याच्या माजी लोकप्रतिनिधींनी केले असेही ते म्हणाले.

  2004 च्या टर्ममध्ये मी आमदार असताना, या भागाचा लोकप्रतिनिधी नसतानासुद्धा कै. चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग भागातील अनेक रस्त्यांकरिता 31 कोटी रूपयांचा निधी आणून या भागात अनेक विकास कामे करण्याचा प्रयत्न केला.

     वैराग भागाने माझी नेहमीच पाठराखण केली असून,नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे .या निवडणुकीत वैराग भाग खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहील याची मला खात्री असून या भागातून जास्तीत जास्त मताधिक्‍य मला देऊन,आपल्या ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन व विनंती त्यांनी केली.

   यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले,नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी,अनिल काका डिसले,डॉ.कपिल कोरके,बाबासाहेब कथले, प्रकाश मनगिरे,सुभाष लोढा, वासुदेव बापू गायकवाड, बाबासाहेब गायकवाड,भारत पवार सर, डॉ.भारत पंके व शेळगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: