अफवा पसरवून दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना थारा देऊ नका- दिलीप सोपल

अफवा पसरवून दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना थारा देऊ नका- दिलीप सोपल

बार्शीशहरातील नागरिकांशी साधला संवाद

बार्शी : कार्यकर्ते व शिवसैनिकांनी शिवसेनेचे धनुष्य बाण हे चिन्ह घराघरात पोहचवले पाहिजे. आपला विजय निश्चित असला तरी गाफिल राहू चालणार नाही. विरोधक अफवा पसवून दिशाभूल करत आहे त्याला थारा देऊ नका असे आवाहन शिवसेना महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांनी केले.

शिवसेना भाजपा रिपाई, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे २४६ बार्शी विधानसभा मतदार संघातील उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्राचारार्थ शुक्रवारी (ता.११) सकाळी सुभाषनगर येथील गौतम मंगल कार्यालयात प्रभाग क्रमांक १,२,३ व ४ मधील नागरीकांशी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

बार्शी तालुक्यातून दहशतवाद, दादागिरी, गुंडगिरीला तडीपार करून भयमुक्त भीतीमुक्त बार्शी करून बार्शीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी दिलीप सोपल यांनाच विजयी करण्याचे आवाहन आधळकर यांनी केले.

यावेळी बार्शी नगरपालीकेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, माजी नगराध्यक्ष गणेश जाधव, नगरसेवक विलास रेणके, त्रिंबक वाणी, पृथ्वीराज राजपूत, दिगंबरबापू कानगुडे, बालाजी कुंभार, बाळासाहेब तातेड बाबुराव जाधव, ध़नंजय ढावारे, भाऊसाहेब कारंडे, माजी पोलीस अधिकारी घुगे उपस्थित होते. विरोधक जनतेची दिशाभूल करून बळजबरीने प्रवेश घडवून आणत असून सौंदरे येथील माझे सहकारी दिगंबर कानगुडे यांच्या बाबतीत तोच प्रकार झाल्याचे यावेळी आंधळकर म्हणाले.
राष्टवादीचे उमेदवार निरंजन भूमकर म्हणजे राऊतांची बी टिम असल्याची टिका यावेळी आंधळकरांनी केली.

ते म्हणाले, वैराग भागातील रखडलेली विकास कामे करण्यासाठी सोपला शिवाय पर्याय नाही बार्शीसह वैराग भागाचा विकास केवळ सोपलच करू शकतात. बार्शी नगपरिषदेच्या माध्यमातून विकासाच्या नावाखाली बार्शीत ठिकठिकाणी रस्ते खणल्याने बार्शीत सर्वच रस्ते पावसात चिखलमय झाले असून नागरीकांची मोठी गैर सोय होत आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश जाधव, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, अनिकेत कारंडे यांनाही समायोचित भाषणे करत विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता महायुतीचे दिलीप सोपल याना विजयी करण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविक माजी नगरसेवक सुनिल जावळी यांनी केले. यावेळी प्रभागातील नागरीकांनी प्रभागाच्या विविध विकास कामांवर चर्चा करत सोपलांना साथ देण्याचा निर्धा़र यावेळी केला.

अपक्ष उमेदवाराचा पाठींबा..

बार्शी विधानसभा मतदार संघातून अपक्ष असलेले उमेदवार राजेश मधुकर बांगर यांनी मेळाव्यात महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांना जाहिर पाठींबा दिला. जय भवानी जय शिवाजी.. कोण आला रे कोण आला शिवसेनाचा वाघ आल्याचा घोषणेने सभागृह दणाणून गेले होते

ग्लोबल न्युज नेटवर्क: