केदारनाथ च्या जवळच्या गुहेत मोदींची ध्यानधारणा

सातव्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आता पंतप्रधान मोदी केदरानाथ जवकेदारनाथळील एका गुहेमध्ये ध्यानाला बसले आहेत. मोदी स्वत: २ किलोमीटर पायी चालत गुहेपर्यंत गेले.
प्रसारमाध्यमांच्या विनंतीवरुन त्यांनी गुहेमधील काही फोटो काढण्याची परवानगी दिली. सकाळपर्यंत मोदींची ही ध्यान धारणा चालेल. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे म्हटले आहे. प्रसारमाध्यम किंवा कुठल्याही व्यक्तीला गुहेच्या आसपासच्या परिसरात प्रवेश करण्याची परवानगी नाही. पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी ९.३०च्या सुमारास डेहराडूनच्या विमानतळावर उतरले आणि विशेष हेलिकॉप्टरने केदारनाथला आले.

admin: