शोभेच्या दारूकामाने भगवंत महोत्सवाची सांगता

गणेश भोळे/धीरज शेळके

बार्शी : बार्शी नगरपालिका व भगवंत देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विदयमाने भगवंत महोत्सव समितीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या भगवंत महोत्सवाची सांगता गुरुवार दि १६ रोजी शोभेच्या दारूकामाने झाली. येथील शिवशक्ती बँकेच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगवंत मैदानावर झालेल्या झालेल्या नेत्रदिपक आतषबाजीने नभांगण उजळून निलाले. बार्शीकरांनी हा नयनरम्य सोहळा अनुभवला व सहा दिवस चाललेल्या भगवंत महोत्सवाची सांगता झाली.


प्रारंभी शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे यांच्या हस्ते भगवंत प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन ओझाले. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे, ॲड परशुराम करंजकर, डॉ.सर्जेराव माने, महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा, प्राचार्य चंद्रकांत मोरे, प्रा राजेंद्र मोरे, कुंडलिक गायकवाड, पं स सदस्य अनिल डिसले, अरुण देबडवार, आप्पा लोखंडे, शिवशक्ती बँकेचे व्यवस्थापक युवराज बारंगुळे, संतोष सुर्यवंशी,प्रशांत खराडे आदी उपस्थित होते.


डॉ प्रकाश बुरगुटे यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून शोभेच्या दारूकामास सुरूवात झाली. आतषबाजीतून साकारलेले भगवंत प्रसन्न हे नाव भक्तांना भावले. यावेळी आकाशात खूप उंचीवर जावून उडणाऱ्या रंगीत आदल्यांनी नभांगण उजळून निघाले. त्याचबरोबर धबधब्याप्रमाणे कोसळणारी तसेच कारंज्याप्रमाणे उडणारी आतषबाजी, शिट्टीसारखा आवाज काढत आकाशात झेपावणारी सुरूने नेत्रसुखद अनुभव दिला. नर्गीस, नागफणा, बंदुकीचा आवाज, मोठया आवाजाच्या आदल्या व गावठी बंदुकीचा आवाज असे विविध प्रकार यामध्ये पहायला मिळाले. सुमारे दोन तास चाललेल्या या आतषबाजी सोहळ्याचा बार्शीकरांनी आनंद घेतला. बार्शीसह खर्डा, माणकेश्वर येथील फायर वर्क्सनी यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत महोत्सवाची शोभा वाढवली. श्रीधर कांबळे यांनी आभार मानले.

चौकट


यावेळी भगवंत मैदानावर प्रथम इंडिया फायर वर्क्स खर्डा ता जामखेड चे जुबेर सय्यद यांनी श्री भगवंत प्रसन्न बोर्ड रिमोटच्या साह्याने सुरू करून  यानंतर नागराज , १५० वॉटर फॉलची फायर करून प्रेक्षकांच्या समोर धबधब्याची प्रतिकृती तयार केली रोमन कॅन्डल केक , मल्टीकलर केक , मल्टी कलर एरीअल शटिंग एरियलने उपस्थीतांची मने जिंकली तर बार्शी येथील एसएमफायर वर्क्स शोएब मो अली मनियार यांनी २०फुटी श्री भगवंत महाद्वार , म्हैसुर कारंजा नर्गिस झाड , १८फुटी सुरुचे झाड , सायरन
शॉट आदींची आतीषबाजी करण्यात आली तर मानकेश्वर येथील स्टार फायर वर्क्सचे सालम लहाजीनी धमाका नागिण त्रिमुर्ती चक्र गोल्डन चक्र तोफा कलर व अस्लम आतार व गनी आतार बंधूनी आकर्षक असे भगवंत प्रसन्न बोर्ड , जय जवान जयकिसानचा बोर्ड प्रज्वलीत केले यानंतर ओम , स्वस्तिक स्टार चारमिनार पंचमुर्ती चक्र सन चक्र आदी मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली

admin: