केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, 200 युनिटपर्यंत वीज मिळणार मोफत

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिल्लीत जे 200 युनिटपर्यंत वीज वापरतात त्यांना वीज बिले देण्याची गरज आता नसणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. या नव्या निर्णयानुसार, दिल्लीकरांचा 200 युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार आहे. तर, 201 ते 400 युनिटपर्यंतच्या वीज बिलावर 50 टक्के अनुदान मिळणार असल्याचे केजरीवालांनी स्पष्ट केले. मात्र ही 50 टक्के सवलत बिलाच्या रकमेवर नाही. तर वीज वापराच्या युनिटवर मिळणार आहे. म्हणजेच, एखाद्याने 300 युनिट वीज वापरल्यास त्याला 150 युनिटसाठी पैसे मोजावे लागतील. विजेच्या वाढत्या बिलांमुळे त्रस्त असलेल्या दिल्लीकरांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: