कसे जगावे आयुष्य हृदय शस्त्रक्रियेनंतरचे…? डॉ अंधारेनी दिला 1600 रुग्णांना मंत्र

ह्रदय रुग्णांसाठी हृदय संजीवनी डॉक्टर विजय अंधारे  . . .   
 मार्कंडेय रुग्णालयात आयुष्य हृदय शस्त्रक्रियेनंतरच्या कार्यक्रमास हजारोंची उपस्थिती  . . .           

सोलापूर: सोलापुरातील  मार्कंडेय रुग्णालयात   हृदय रुग्णांचा महापूर . . .   जगण्याला पंख फुटले “या संकल्पनेवर डॉक्टर विजय अंधारे यांचा आयुष्य हृदय शस्त्रक्रियेनंतरचे हा संभाषणात्मक कार्यक्रम आज दि.6 रोजी रोजी मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयांमध्ये झाला.

या कार्यक्रमासाठी हृदय शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना समुद्रच  जमा झाला होता .या कार्यक्रमासाठी एकूण १६०० लोकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास डॉ. माधवी रायते ,आरोग्य अधिकारी संतोष नवले ,महात्मा फुले योजनेची जिल्हाप्रमुख शिवशरण गवंडी ,डॉक्टर नयना काळे, मार्कंडेय रुग्णालयाचे व्यवस्थापक सत्यनारायण  बोल्ली,  डॉ. माणिक गुर्रम , विजय कुमार अरकाल, अन्नलदास यांची उपस्थिती होती .

उपस्थित रुग्णाना हृदयाच्या रचनेविषयी आजाराविषयी आणि उपचारांविषयी माहिती दिली . ह्यदयशस्त्रक्रियेसंबंधीच्या समज गैरसमजाबद्दल कल्पना दिली . तसेच हृदयाचे आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर काय काळजी घ्यावी याबद्दल सांगितले.

NEW PROJECT* या कार्यक्रमात डॉक्टर अंधारे यांनी एक विशेष घोषणा केली त्यांनी” हृदय संजीवनी” हा नवीन प्रकल्प सोलापुरात उभा करण्याचे ठरवले आहे. भारत देशामध्ये वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत आयुर्वेद ॲलोपॅथी होमिओपॅथी नॅचरोपॅथी रुग्णांना एकाच छताखाली या सर्व उपचारपद्धती बद्दल माहिती मिळावी आणि उपचार निवडण्याचे स्वातंत्र्य असावे असा त्या मागचा हेतू आहे.

डॉक्टर अंधारे असे म्हणाले की उपचारपद्धती वेगवेगळे असल्या तरी प्रत्येक उपचार पद्धतीचे एक महत्त्व आणि गुण आहे .सध्याच्या बाजारीकरण झालेल्या या विश्वामध्ये लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे कुणी ऑपरेशनची भीती घालून आयुष उपचार करते तर कुणी आयुषमध्ये काही गुण नाही ऑपरेशन लागेल असे सांगत  समाजाच्या मनात गोंधळ उडतो. त्या सगल्या प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असाव्यात आणि उपचार निवडीचे  स्वातंत्र्य असावे असा त्या मागचा  उद्देश आहे. 

निसर्गरम्य आणि शांत वातावरणामध्ये लोकांना राहण्याची सुविधाही असेल .हॉस्पिटलमधील उपचारानंतर  पूर्ण बरे होण्यासाठी जो अवधी लागतो तो घरी काढण्यापेक्षा अशा ठिकाणी काढला तर रुग्णाला योग्य काळजी आहार व्यायाम आणि आयुष्मान बदलण्याचे व्यवस्थित मार्गदर्शन होईल.

BEST STAFF CERTIFICATE या विभागात काम करणाऱ्या काही विशेष कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला त्यांच्याविषयी बोलताना डॉक्टर विजय अंधारे म्हणाले बऱ्याच परिचारिका सेवक पोटापुरते काम आणि पैसे मिळावे म्हणून या व्यवसायाकडे वळतात सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे काही लोकांना पुढचे शिक्षण घेता येत नाही परंतु काम करत असताना असं वाटते की या मुला मुलींना उच्च शिक्षण मिळालं असतं तर खरोखर आयुष्यामध्ये ते खूप मोठ्या पदावर जाऊ शकले असते. त्यांचं कौशल्य आणि कामातील जबाबदारीने वागण्याची पद्धती मेहनत पाहून या विभागात काम करणाऱ्या पंधरा सदस्यांना मानपत्र देण्यात आले. या विभागात सर्वात जास्त कौशल्य आणि मेहनत करणाऱ्या ममता मुंगापाटील, दिव्या कोटा आणि केशव मेरगू यांना विशेष सन्मानित करण्यात आले. आपल्या कौशल्याने आयुष्यामध्ये ते खूप प्रगती करतील असे डॉक्टर विजय म्हणाले.PATIENT FELICITATION AND POOJA MESSAGE TO SOCIETY रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानली जाते.

या कार्यक्रमात त्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले.जगण्याला पंख फुटले या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात हृदयशस्त्रक्रियेनंतर चांगले आयुष्य जगणाऱ्या आठ मुला मुलींचा प्रतिकात्मक रुपाने सर्वांसमोर सन्मान करण्यात आला .विभागातील कर्मचाऱ्यांनी व अश्विनी अंधारे यांनी त्यांना ओवाळून आणि पुष्पहार देऊन त्याचबरोबर एक मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला

याच विभागामध्ये हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झालेले श्रीरामलू हे पूजा पाठ करणारी व्यक्ती आहेत त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी ही आरती पूजा होत असताना शतायुषी भव आणि आणि मृत्यूंजय  मंत्रांचे उच्चारण केले रुग्णांची डॉक्टरांकडून आणि विभागातील कर्मचाऱ्यांकडून अशाप्रकारे आरती पाहुन  उपस्थितांचे डोळे भरून आले

सत्कारासाठी निवडलेल्या  मुली नवविवाहित आणि नुकतेच अपत्य झालेल्या होत्या .यातून समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्व मुली हृदय शस्त्रक्रियेनंतर ही आपली संसारिक आयुष्य खूप छान जगत आहेत.हृदय शस्त्रक्रिया  झाल्यामुळे त्यांच्या भौतिक आयुष्यामध्ये कुठलाही फरक आलेला नाही .विजय अंधारे याबद्दल बोलताना म्हणाले की आजही शस्त्रक्रिया करताना ते पैशंटच्या शरिरावर पुरेपूर विश्वास टाकतात आणि  समर्पण केलेची भावना म्हणून ज्या रुग्णावर ऑपरेशन करायचे आहे त्याचा पाया पडून ऑपरेशन सुरू करतात की तू मला साथ दे तर मी  यशस्वी होईल अशी त्यामागची भावना असते.

POOR PATIENT PACKAGE ANOOUNCEMENT या कार्यक्रमात बोलताना रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम व हृदय शल्यविशारद डॉक्टर विजय अंधारे यांनी गोरगरीब रुग्णांना हृदय संजीवनी हे बायपास सर्जरीसाठी कमी किमतीचे पॅकेज जाहीर केले.BEST MOMENT OF PRAYER या कार्यक्रमाची सांगता होताना” घेतला जो श्वास तो पुन्हा न लाभणे माणसाने माणसाशी माणसा सम वागने “उंबुटू या या सिनेमातील ही प्रार्थना सर्व उपस्थितांनी रुग्ण  केली. हजारोंच्या संख्येने जमलेल्या लोकांनी ही प्रार्थना एकत्र करण हा खूप रोमांचित करणारा क्षण होता.मार्कंडेय रुग्णालयाला त्याक्षणी  एका मंदिराचे रूप आले असे जाणवत होते.

HEART TOPIC DISCUSSION आयुष्य हृदय शस्त्रक्रियेनंतरचे या कार्यक्रमांमध्ये हृदयाच्या आजाराबद्दल च्या वेगवेगळ्या शंका बद्दल प्रश्नावली तयार करून त्याची उत्तरे अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये लोकांना समजावून सांगण्याचा   प्रयत्न केला.हृदयाच्या आजाराचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात हृदयाच्या पडद्यामध्ये छिद्र असणे  झडपा खराब  असणे  हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा असणे या सर्वांची लक्षणे म्हणजे छातीमध्ये धडधड होणे छातीमध्ये दुखणे दम लागणे अशी असतात हृदयाचे आजार होऊ नये म्हणून पिढ्यान पिढ्या नातेसंबंधात लग्न करू नका .

सर्दी पडसे खोकला घसा बसणे यांच्यावर प्रतिजैविके घ्यामीठ मटण तंबाखू सिगारेट विडी गुटखा मावा  टाळ। उंचीप्रमाणे वजन ठेवा व्यायाम करा ताणतणाव टाळ.मधुमेहींनी आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी व्यवस्थित आहार घ्यावा व्यायाम करावा आणि औषधे घ्यावीतया साध्या गोष्टी पाळूनही हृदयाच्या आजारापासून मुक्त होता येते असे सांगितले पिढ्यान पिढ्या अनुवांशिक हृदयरोगाबाबत बोलायच तर असा आजार टाळता येत नसला तरी त्याची लक्षणे जाणवताच लगेच विशेष तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा .आपण नशीब वाईट आहे असं म्हणतो  निसर्ग वाईट कधीच नसतो असलेली लक्षणे हे तुमच्यासाठी एक चिन्ह आहे ते ते ओळखून योग्य वेळी सल्ला घेणं गरजेचं आहे .

हा उपक्रम मार्कंडेय सहकारी रुग्णालय हृदयशस्त्रक्रिया विभाग एक सामाजिक चळवळ म्हणून राबवत आहे.मागील सात वर्षांमध्ये मार्कंडेय रुग्णालयांमध्ये जवळपास तीन हजार सातशे हृदय फुप्फुस आणि रक्तवाहिन्यांच्या शस्त्रक्रिया  ९८ टक्के यशाच्या दराने  केल्या आहेत.

MESSAGE TO ALL या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर अंधारें तुमचा समाजासाठी संदेश काय असेल असे विचारले असता त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या.हृदयाचा आजार आणि त्याची लक्षणे याचे लवकर निदान होणे गरजेचे असते निदान लवकर झाले तर त्याला होणारी इजा टाळता येते उपचार वेळेत झाल्यास हृदयाला नुकसान पोहचत नाही आणि पुढील आयुष्यमान चांगले मिळण्यास मदत होते ज्याला नुकसान झाल्यानंतर कोणत्याही औषधांचा किंवा शस्त्रक्रियेचा तेवढा लाभ होत नाही त्यामुळे याची लक्षणे दिसताच छातीत दुखणे धडधड होणे दम लागणे या गोष्टींना गांभीर्याने घेऊन डॉक्टरांना दाखवावे असे त्यांनी सांगितले .

एन्जोग्राफी हृदय शस्त्रक्रिया यांना घाबरू नये यशाचे प्प्रमाण खूप वाढले आहे असंही त्यांनी रुग्णांना सार्थ विश्वास दिला उपचारांची किंमत खूप जास्त असल्याने आरोग्य विमा सर्वांनी वेळीच घ्यावा असाही सल्ला त्यांनी दिला.PUBLIC REACTION या कार्यक्रमात आलेल्या रुग्णांनी डॉक्टर अंधारे यांना हृदय रुग्णांसाठी आराध्य दैवत आहेत असे सांगितले .

हृदयाच्या आजाराच्या उपचारांविषयी त्यांचे मत खूप प्रामाणिक असते .याबद्दलही खूप कौतुक केले.त्यांचे ह्दयशस्त्रक्रियेत मिळणाऱ्या यशाचे प्रमाण खूप जास्त असल्याने सोलापूरकरांसाठी ते वरदान आहेत असेही संबोधण्यात आले .उपस्थितांची संख्या हजारांपेक्षा जास्त असल्याने रुग्णालयांमध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी सत्तर इंच स्क्रीन लावून हा प्रोग्राम प्रसारित करण्यात आला.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: