तर स्वतःच्या मुलांना का नाही जिल्हा परिषद शाळेत घालत ? काय म्हणाले रोहित पवार,वाचा सविस्तर-

रोहितदादा पवार यांचा आज वाढदिवस !

रोहितदादा यांचं जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत मोठं काम आहे. वेळोवेळी जाऊन सर्वसामान्य मुलांना कसे चांगले शिक्षण मिळेल या साठी त्यांचे प्रयत्न अविरत सुरू असतात. त्यांना काही लोकांनी विचारलं सुद्धा की रोहितदादा तुम्हाला जर जिल्हा परिषदेच्या शाळेची जर इतकी आपुलकी आहे तर तुम्ही स्वतः च्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत का घालत नाहीत ?


त्यावर दादांनी एकच उत्तर दिले. की माझ्या मुलांना कुठं शिक्षण घ्यायचं तो त्यांचा प्रश्न आहे. मी पालक म्हणून त्यांच्या इच्छे च्या आड येणार नाही. मात्र त्याच बरोबर सर्वसामान्य मुलांना माझ्या मुलांना जितकं चांगले शिक्षण मिळत आहे तितकेच चांगले शिक्षण मिळावे म्हणून मी करत असलेला प्रयत्न कुठं चुकीचा आहे ? सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना सुद्धा माझ्या मुलांना जे शिक्षण मिळते तेच शिक्षण मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तो मी करणारच ! इतकं स्पष्ट सांगणारे रोहितदादाच आहेत. याच उदाहरणातून आपल्याला रोहितदादा यांची शिक्षणाच्या बाबतीत असलेली दूरदृष्टी दिसून येते.

सामाजिक क्षेत्रात प्रचंड मोठं काम असलेलं युवा नेतृत्व म्हणजे रोहितदादा याची प्रचिती आली ती ओला आणि कोरडा दुष्काळ जेंव्हा महाराष्ट्रात पडला तेंव्हा. आजही महाराष्ट्रात ठीक ठिकाणी लोकांना टँकर च्या माध्यमातून पाणी पोहचवण्याचे काम अविरत सुरू आहे. बीड, कर्जत-जामखेड, सातारा..अशा विविध ठिकाणी त्यांचे दुष्काळात लोकांना पाणी देण्याचे काम मोठं आहे. आणि आजही पाणी देण्याचे काम अविरत सुरू आहे.

जेंव्हा सांगली, कोल्हापूर मध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांना मदतीची गरज होती. त्या वेळी रोहितदादा मदत घेऊन स्वतः गेले. ठीक ठिकाणी भेटी दिल्या. लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि ठीक ठिकाणी जशी मदत हवी आहे तशी मदत पाठवली. रात्री च्या बारा-एक वाजेपर्यंत जागून पूरग्रस्त भागात मदत करण्याचे काम रोहितदादा पवार यांनी केलं. त्या ठिकाणी जाऊन कित्येक लोकांनी स्टंट बाजी केली पण असल्या स्टंट च्या भानगडीत न पडता आपल्या लोकांना मदतीची गरज आहे म्हणून अविरत झटणारा युवा नेता म्हणजे रोहितदादा पवार !

वेळोवेळी सृजन च्या माध्यमातून तरुणांना, तरुणींना, व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न खूप मोठा आहे. आजपर्यंत हजारो मुलांना संधी देण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे. आणि आजही अविरत सृजन च्या माध्यमातून काम सुरू आहे. तरुणाईला कशा प्रकारे अजून संधी देता येतील म्हणून अविरत काम करणारा नेता म्हणून आजही महाराष्ट्रात रोहितदादा पवार यांना ओळखले जाते.

रोहितदादा वेळवेळो बोलून दाखवतात की आमचा पिंड हा सामाजिक आहे. आमच्या सामाजिक कामाला पन्नास वर्षांची पार्श्वभूमी आहे. आणि ही गोष्ट आज सर्वांना वेळोवेळी दिसून आलेली आहे.

आदरणीय रोहितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

~ गणेश शिंदे

admin: