काँग्रेसची 51 जणांची पहिली यादी जाहीर! यांचा आहे समावेश

राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये काँग्रेसने 51 उमेदवारांची घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, नितीन राऊत आदींचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्यापासून राज्यात सर्वत्र जोमाने विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याच दरम्यान काँग्रेसने आपल्या 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

लोकसभा निवडणुकीला नांदेडमध्ये पराभवाचा धक्का बसलेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. भोकरमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरेश बाळू धानोकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोळकर यांना वरोरा (Warora) मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे. तर प्रणिती शिंदे यांना सोलापूर शहर मध्य मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर झाली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे्. दोघांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. दोघांमध्ये 50:50 चा फॉर्म्यूला ठरला आणि 125-125 जागा लढवण्याचे जाहीर केले.

तर मित्रपक्षांना 38 जागा देण्यात आल्या. यानंतर शरद पवार यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची घोषणा केली होती. परंतु काँग्रेसने अद्यापही कोणत्याही मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला नव्हता. अखेर पितृपक्ष संपल्यानंतर काँग्रेसने 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

~~~~~~~~
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: