उस्मानाबादला उभारले जाणार सुसज्ज बसस्थानक;10 कोटी मंजूर

उस्मानाबाद:
२९ हजार ५९० स्के.फुटामध्ये उस्मानाबाद बसस्थानकाची वास्तु उभारणार असून दोन मजली असलेल्या वास्तुमध्ये २२ फ्लॅटफॉर्म राहणार आहेत. त्यामुळे पुढील ४० वर्षांच्या हिशोबाने उस्मानाबाद बसस्थानक सुसज्ज उभारले जाणार आहे.

परिवहन मंत्री रावते यांनी १० कोटी १५ लाख २ हजार ५०० रूपयांच्या आराखडयास  तात्काळ मंजुरी देऊन आदेश काढले आहेत.

या संदर्भात खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन उस्मानाबाद बसस्थानका संदर्भात मागणी केली होती.

२१ फेब्रुवारी २०१९ रोजी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी परिवहनमंत्री रावते यांची सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर आदी पदाधिका-यांसह भेट घेऊन उस्मानाबादला सुसज्ज बसस्थानक उभारण्यासंदर्भात मागणी केली होती.

परिवहनमंत्री रावते यांनी बसस्थानकासाठी आर्केटेक्ट अजित ठाकुर अॅंड आसोसिएट ची नेमणूक करून बसस्थानकाचा आराखडा तयार करून घेण्यात आला. खा.ओमराजे निंबाळकर यांनी २९ हजार ५९० स्के. फुट मध्ये बसस्थानकाची वास्तु उभारणार असून यामध्ये २२ फ्लॉटफार्म  उभारले जाणार असून पुर्ण बस या निवा-याखाली उभारली जाणार आहे. बसस्थानकाची वास्तू दोन मजली असून दुस-या मजल्यावर चालक, वाहक व अधिकारी वर्गांसाठी दोन हॉल विश्रांतीसाठी असतील.

तर महिलासाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. तर दुस-या बाजूला दोन व्हीआयपी सूट ची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी हिकरणी कक्ष राहणार आहेत. बसस्थानकामध्ये प्रवाशांना वेळोवेळी माहिती तात्काळ मिळण्यासाठी डिसप्ले स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. या बसस्थानकामध्ये पाच दुकाने एक उपहार गृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये जेणेरीक औषध दुकान आदी राहणार आहेत.

सदर आराखडयास प्रशासकीय मंजुरी ८ ऑगस्ट २०१९ रोजी घेतल्यानंतर खा.ओमराजे निंबाळकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर, जिल्हा प्रमुख कैलास पाटील यांनी तातडीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन बांधण्याच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा केली. रावते यांनी बांधकाम महाव्यवस्थापक कार्यालयातील जवंजाळ यांना तात्काळ निविदा प्रक्रिया काढण्यासंदर्भात आदेशीत केले. या बसस्थानकाचे एकुण अंदाजपत्रक १० कोटी १५ लाख २ हजार ५०० रूपये इतके आहे. खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लवकरच परिवनमंत्री दिवाकर रावते व पालकमंत्री प्रा.तानाजी सावंत यांच्या हस्ते नवीन सुसज्ज बसस्थानकाचे भुमीपुजन करण्यात येईल, असे सांगितले. 

ग्लोबल न्युज नेटवर्क: