वाचा वॉटर कप स्पर्धेत राज्यात प्रथम आलेल्या बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाची यशोगाथा

तालुक्यातील सुर्डीत श्रमदानाच्या तुफानाचे यश ,विक्रमी लोकसहभाग ठरला महत्वाचा
गावाला राज्यात पहिले आणायचे या ध्येयानेच केले जलसंधारणाचे सर्व उपचार

गणेश भोळे/धीरज करळे

बार्शी: गाव तसे पूवीर्पासूनच सधन व बागायती म्हणून ओळख. गावाच्या शिवारात 25 टक्के डोंगराळ भाग. मात्र उन्हाळ्यामध्ये दरवर्षी विहिरी तळ गाठायच्या हा नेहमीचाच अनुभव. परंतु यावर्षी गावकºयांनी ठाम निर्धार करीत उन्हाळ्यामध्ये देखील गावातील विहिरी पाण्याने डबडबल्या पाहिजेत, असा ठाम निर्धार करीत पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला. पंचेचाळीस दिवस चाललेल्या या स्पर्धेत दररोज अडीच हजारापेक्षा जास्त गावकºयांनी श्रमदान करत कोणत्याही परिस्थतीत गावाचा राज्यात नंबर आणायचा या उद्देशाने जिद्दीला पेटून काम केले़ हे करीत असताना मनसंधारण, मृदासंधारण, जलसंधारण, वृक्षारोपण आदी गुणवत्तेची कामे करुन विक्रमी लोकसहभाग मिळवला़ व त्याचे फलित गावाचा राज्यात पहिला क्रमांक आला़ या पहिल्या क्रमांकाच्या उत्तेजनाने गावकऱ्यांनी अक्षरश: दिवाळी साजरी केली.

तालुक्यातील वैराग भागात असलेले सुर्डी हे 3,377 लोकवस्तीचे गाव. गावामध्ये 757 कुटुंबे राहतात. गावाचे क्षेत्र 2,374 हेक्टर असून खातेदाराची संख्या 1,570 आहे. यापैकी रब्बीचे क्षेत्र 810 हेक्टर तर उर्वरित क्षेत्र खरीप व बागायती आहे. यावर्षी पाणी फाऊंडेशनचे नितीन आतकरे हे गावात आले व त्यांनी या स्पधेर्चे महत्त्व पटवून दिले. त्यानुसार मधुकर डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली 6 जणांची टीम पाणी फाऊंडेशनची तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण करुन आली.

त्यानंतर सहा जणांच्या तीन टीम पाठवून अठरा जणांनी प्रशिक्षण घेतले़ पुढे गावातील सर्व राजकीय गटांच्या व्यक्तींना एकत्रित बोलावून सव्वा महिना त्यांचे मनसंधारण केले. प्रोजेक्टरच्या सहाय्याने वाड्या वस्त्यांवर जल साक्षरता केली. दररोज सुमारे 20 ते 25 किलोमीटर शिवार फेरी केली. साहित्य खरेदी करुन निधी संकलनाला सुरुवात करुन यंदा वॉटर कप स्पर्धेत भाग घेवून गावाला पाणीदार करावयाचे असा निर्णय झाला.

8 एप्रिलला श्रमदानाचे काम करण्यासाठी तब्बल 790 नागरिक जमा झाले. दुसºया दिवशी ही संख्या 1 हजार व पुढे १३०० वर गेली. पुढे हा आकडा वाढत जाऊन दोन ते अडीच हजारावर स्थिरावला़ एका दिवशी तर तब्बल तीन हजार लोक श्रमदानाच्या कामावर होते़ 200 पेक्षा जास्त कुटुंबांची कामावर हजेरी होती़ लहान मुलांपासून 75 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग होता.

स्पर्धेच्या कालावधीत सुर्डीकरांनी श्रमदानातून म्हणजे मनुष्यबळातून १७५०० घ़मि़ काम करणे गरजेचे असताना २२ हजार घ़मी़ काम,मनिशच्या सहाय्याने २ लाख ५२ हजार ४०० मिटच्या ऐवजी ३ लाख घ़मी़ काम केले़ यात १४ कि़मी़ लांबीचे डीप़सी़टी़टी मशिनच्या सहाय्याने, ३२ हजार घ़मिटर कंपार्टमेंट बंडीग, २७ इनलेट-आऊटलेट शेततळी,२७ हजार घ़मि़ (३ कि़मी़) ओढा खोलीकरण,दगडी पिंचींग, ५ विहीरी पुर्नभरण, ७०० जलशोषक चर,१६०० वृक्षारोपण,६१२ शोषखड्डे गावात घेतले त्यामुळे उन्हाळ्यात हातपंपाचे पाणी वाढले.

माथा ते पायथा हे जलसंधारणाचे सर्व उपचार या स्पर्धा कालावधीत केले़कित्येक वषे जाता येत नव्हते असे रस्ते खुले केले़ गावात दिलीप सोपल विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहिम राबवून गाव स्वच्छ केले आहे़ त्यामुळेच हे गाव आज राज्यात प्रथम आले.

यांनी केले सहकार्य

या कामासाठी बालाजी अमाईन्स सोलापूर ११० तास पोकलेन मशिन, स्रेहालय अहमदनगर यांची एक लाखाची इश्वरी चिठ्ठी,अनिवासी सुर्डीकरांची पाच लाखांची मदत, विक्रीकर उपायुक्त प्रकाश शेळकेयांची ही भरीव आर्थिक मदत, गावातील माध्य,प्राथमिक शिक्षक, इतर नौकदार यांनी ठरवून दिलेली रक्कम दिली़ शिवाय गावकऱ्यांनी सर्वच बाबतीत सहभाग नोंदवला.

सर्व गावाचा सहभाग

गावातील 75 पेक्षा जास्त वयाच्या महिला नाष्टयाचे व स्वयंपाकाचे काम केले तर ज्येष्ठ नागरिकांनी पाणी वाटण्याचे आणि लहान मुलांनी दगड गोठे गोळा करण्याचे काम मनोभावे केले़ दररोजचा नाष्टा देण्यासाठी गावकºयांची चढाओढ होती़त्यासाठी चिठ्ठी काढून नाष्टा खावू घालण्याचा मान दिला होता़ श्रमदानाचे काम गावापासून लांब असल्याने गावातील 12 वाहने वाहनमालकांनी मोफत ने-आण करण्यासाठी दिली. दररोज सकाळी 6 ते 8 या वेळेत हॉटेल, सलून व इतर व्यवसाय बंद ठेवले जातात. तात्यासाहेब शेळके हे एक पाय नसलेले व प्रकाश डोईफोडे हे एक हात नसलेले नागरिकही दररोज श्रमदान करण्यासाठी येऊन काम करणाºयांचा उत्साह वाढवत होते.या सर्व कामात महिलांचा सहभाग ही मोठा होता़ यात माणसांना कामावर बोलावरी, कामाची मोजमाफे व मशिनवर्क ,स्पिकर द्वारे बोलावणी अशा वेगवेगळ्या टीमला कामे वाटून दिली होती़ या सर्वावर प्रशिक्षण घेतलेली टीम कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देत होती़ सुर्डीकरांनी मनावर घेवून हे काम चालू केल्याने गावात खºया अथार्ने तुफान आलंया असे चित्र निर्माण झाले होते.

४३ लाखांचा लोकसहभाग

या कालावधीत अन्नदानावर लोकसहभागातून सोडतीन लाख खर्च झाले़ ४३ लाख रुपये लोकवर्गणी जमा झाली़ महिलांनी त्यांच्याकडे जमा झालेले २५ हजार दिले़ रोजचे वाढदिवस,पुण्यतिथी कामावर साजरी केली गेली़ आचारी सेवा, वाहन सेवा, गॅस ,पाणी आदी सेवा गावकºयांनी मोफत दिल्या़
यांनी दिल्या भेटी, विक्रमीगर्दीची ग्रामसभा
गावातील ग्रामसभा या विक्रमी गर्दीच्या झाल्या़ पोपटराव पवार,कृषी अधिकारी डी़एल़ मोहिते व जलसंधारण तज्ञ हरिश डावरे यांच्या टीमने गावाची पाहणी केली त्यादिवशीच्या ग्रामसभेला तब्बल तीन हजार लोक उपस्थित होते़ डॉ़ अविनाश पौळ यांनी ही गावाला भेट दिली होती.

बार्शीतील विविध संघटनांनी केले श्रमदान

बार्शीतील मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी, कृषी पदवीधर मंडळ, महसूल कर्मचारी, पोलीस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, जय शिवराय प्रतिष्ठन,युवा ग्रुप आदी विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: