उदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातुन बाहेर पडू-रामराजेंचा राष्ट्रवादी ला इशारा

सातारा: नीरा देवधरच्या पाणी वाटपावरून खा. उदयनराजे भोसले यांनी माढ्याचे खा. रणजितसिंह निंबाळकर यांची पाठ थोपटताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला होता, आता उदयनराजे यांच्या वक्तव्याने संतापलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंना आवरा, अन्यथा पक्षातून बाहेर पडू, असा इशारा शरद पवारांना दिला आहे.

नीरा देवधरच्या पाण्यावरून भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडीत पकडल्याचे चित्र पहायला मिळत आहे, नियमबाह्यपणे बारामतीला वळवण्यात आलेले नीरा देवधरचे पाणी बंड करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे, पाणी बंद करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने बुधवारी काढला. दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येचं मोठे वादळ निर्माण होणार असल्याचं पहायला मिळत आहे.

नेमक काय म्हणाले रामराजे निंबाळकर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीटिंग बोलावली आहे. त्यात त्यांना सांगणार आहे, तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत, असा इशारा रामराजे यांनी दिला आहे.

जिल्ह्यात जोपर्यंत पिसाळलेली कुत्री आहेत. तो पर्यंत माझी भूमिकाही पिसाळलेलीच असेल, असं म्हणत  नाईक निंबाळकरांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंवर जहरी टीका केली आहे.

admin: