उदयनराजेंचे नाव पुकारताच लोकसभेत शिवरायांचा जयघोष..

दिल्ली: ३५० वर्षानंतरही महाराष्ट्रच नव्हे तर, संपुर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रभुत्व असल्याचा दाखला देणारा प्रसंग आज लोकसभेत बघायल मिळाला. केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला आज संसदीत अधिवेशनाने सुरूवात झाली. आज १७ व्या लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला.

शपथ ग्रहण करण्यासाठी सदस्याचे नाव पुकारल्या नंतर उपस्थितांकडुन डेस्क वाजवून स्वागत करण्यात येत होते. अनेकांच्या वेळी “भारत माता की जय” च्या घोषणाही देण्यात आल्या. मात्र प्रमुख मंत्री व देशातील इतर मोठ्या नेत्यांपेक्षाही सभागृह दणाणुन गेले ते खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शपथेवेळी.

“श्रीमंत उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले जी” असा नामोल्लेख झाला आणि उपस्थित खासदारांनी.. “बोलीए छत्रपती शिवाजी महाराज की जय” म्हणत एकच जयघोष केला. उदयनराजे यांनी इंग्रजीत शपथ घेतली व शेवटी “जय भारत जय भवानी जय शिवराय” अशी घोषणा दिली तेव्हा परत सभागृहातील खासदारांनी डेस्क वाजवत छत्रपतींचा जयघोष केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे https://www.facebook.com/globalnewsmarathi/ फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर .Log On करा
www.global newsmarathi.com
खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.

धिरज करळे: