उजनी 111 टक्के भरले,धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा भीमा नदीत विसर्ग

पंढरपूर- उजनी धरण १११ टक्के भरल्याने प्रकल्पातून १० हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वीरमधून ४६०० क्युसेक चा विसर्ग सुरु आहे.

उजनी व वीर मधून मागील १५ दिवसात १०० टीएमसी पाणी सोडले गेल्याने नीरा व भीमा काठी पूर होता. भीमा नीरा खोर्यात पाऊस थांबल्यानंतर पाणी विसर्ग कमी झाला होता.

वीर १०० % भरल्याने तेथे पाणी साठविण्यासाठी जागा नाही. सकाळी १४ हजार क्युसेक विसर्ग नीरा नदीत सोडला जात होता. सायंकाळी तो ४६०० करण्यात आला आहे. उजनी १११ टक्के म्हणजे क्षमतेने भरल्याने यातून १० हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. दौंडजवळून १२ हजार चा विसर्ग धरणात येत आहे.

उजनी स्थिती

पाणी पातळी ४९७.३२० मी,पाणी साठा ३४८७.७१ दलघमी,उपयुक्त साठा १६८४.९० दलघमी,टक्के १११.००,दौंड विसर्ग। १२५७७ क्युसेक,उजनीतून विसर्ग १० हजार क्युसेक,

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: