उजनी व वीरमधून १ लाख ३२ हजार क्युसेक विसर्ग, भीमेकाठी सतर्कतेचा इशारा

उजनी व वीरमधून १ लाख ३२ हजार क्युसेक विसर्ग, भीमेकाठी सतर्कतेचा इशारा

 पार्थ आराध्ये

पंढरपूर– उजनी धरणातून १ लाख व वीरमधून ३२ हजार क्युसेक पाणी सोडले जात असल्याने भीमा नदीला पूरसद्रुष्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दौंडजवळून उजनी धरणात मिसळणारी 40 हजार क्युसेकच्या पुढे गेल्याने  धरणातून भीमा नदीत १ लाख क्युसेकचा विसर्ग केला जात आहे. भीमा खोरे व उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे.

उजनी धरण क्षमतेने भरले असून यात पाणी साठवण करण्यासाठी जागा नसल्याने येणारी आवक पुढे सोडण्याशिवाय पर्याय नाही. धरणातून कालवा, सीना माढा योजना, बोगदा, दहिगाव योजनेत पाणी सोडले जात आहे.

याच बरोबर वीज निर्मितीसाठी देखील 1600 क्युसेकने पाणी सोडले जात असल्याने भीमा नदीत एकूण विसर्ग १ लाख १ हजार ६०० क्युसेकचा इतका आहे.दरम्यान नीरा खोर्यात होत असलेल्या पावसाने वीर धरणातून नीरा नदीत ,३२ हजार क्युसेक पाणी विसर्ग आहे. हे पाणी संगमजवळून भीमेत मिसळते. उजनी व वीरच्या पाण्याने भीमेची पाणी पातळी झपाट्याने वाढेल.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: