उजनीत आवक वाढणार, घाट माथ्यावर पावसाचा जोर

पार्थ आराध्ये

पंढरपूर-  उजनी धरणात येणार्‍या पाण्याची आवक मंदावल्याने भीमेत सोडण्यात  येणारे पाणी बंद करण्यात आले होते. मात्र गुरूवारी रात्री पासून भीमा खोर्‍यासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने दौंडची आवक 40 हजार क्युसेकपर्यंत  जाण्याची शक्यता गृहीत धरून उजनीतून पुन्हा पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

उजनी प्रकल्प 110 टक्के भरला असून यात पाणी साठविण्यास जागा आता शिल्लक नाही. मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने दौंडची आवक वाढल्याने भीमेत सतत पाण्याचा विसर्ग होत  होता. मात्र मागील दोन दिवसात आवक घटल्याने उजनीतून नदीत सोडण्यात येणारे पाणी कालपासून बंद करण्यात आले होते.

मात्र  पुन्हा घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याने दौंडची आवक तीस ते चाळीस हजार क्युसेक इतकी होईल असे गृहीत धरून उजनीतून 2 हजार क्युसेकने सांडवा तर 1600 क्युसेक पाणी वीज निर्मितीसाठी सोडण्यास शुक्रवारी सकाळी सुरूवात झाली आहे.  या पावसाळ्यात उजनी जलाशयावर मात्र केवळ 155 मिलीमीटर इतक्या नीचांकी पावसाची नोंद आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: