उजनीतून 25 हजार क्युसेक पाणी भीमेत सोडले

पंढरपूर- दौंडजवळून उजनीत मिसळणारी आवक वाढल्याने धरणातून भीमा नदीत 25 हजार क्युसेकचा विसर्ग सांडव्यातून तर 1600 क्युसेक पाणी वीज निर्मितीसाठी सोडले जात आहे.

मागील दोन दिवसांपासून उजनी धरणात येणार्‍या पाण्याची आवक वाढत चालली असून पुणे व परिसरात परतीच्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. यामुळे उजनीतून पहाटे दोन वाजल्यापासून 26 हजार 600 क्युसेक पाणी भीमा नदीत सोडले जात आहे. यातच भीमा काठी पावसाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून असल्याने नदी दुथडी भरून वाहणार आहे.

पुणे परिसरात काल रात्री ही मोठा पाऊस झाला आहे यामुळे पुणे बंडगार्डन व पुढे दौंडची आवक वाढत चालल्याने पहाटे उजनीतून  सोडण्यात येणारा विसर्ग हा 25 हजार क्युसेकवर नेण्यात आला आहे. धरण क्षमतेने भरल्यात यात पाणी साठविण्याची क्षमता नाही. यातच सोलापूर जिल्ह्यात ही परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे ओढ्या  व नाल्यातून भीमेत पाणी येत आहे. याचा परिणाम नदीची पाणी पातळी आणखी वाढू शकते .

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: