उजनीतून भीमेत लाख क्युसेकचा विसर्ग,पंढरपुरात महापूर

उजनीतून भीमेत लाख क्युसेकचा विसर्ग

पंढरपूर, दि.5- भीमा खोर्‍यातील पावसामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक ही 2 लाख 14 हजार क्युसेक झाल्याने रात्री 8 हवाजता धरणातून भीमा नदीत 1 लाख क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. तर वीर मधून सकाळपासून एक लाख क्युसेकचा विसर्ग नीरेत केला जात होता. सोडण्यात येणार्‍या पाण्याचे प्रमाण पाहता नीरा व भीमा काठी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पंढरपूरला नदीकाठच्या झोपडपट्ट्यातील नागरिकांना पालिकेने सुरक्षित स्थळी हलविले आहे.उजनी येणारी पाण्याची आवक ही झपाट्याने वाढत आहे. खडकवासला, मुळशी, पवना, वडीवळे, चासकमान, कासारसाई, भामा आसखेडा, आंध्रा, कलमोडी या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने दौंडचा विसर्ग हा 2 लाख 20 हजार क्युसेकच्या आसपास पोहोचला होता. धरण 78 टक्के उपयुक्त पातळीत भरले असून येणारी आवक पाहता ते सहजपणे क्षमतेने भरू शकते. सकाळी उजनीतून 5 हजार क्युसेकने पाणी सोडले गेले नंतर ते 10 हजार , 25 हजार , पन्नास व सायंकाळी सहा वाजता सत्तर हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग भीमेत केला जात होता. आता तो 1 लाख क्युसेक करण्यात आला आहे.दरम्यान भीमा नदीवरील दगडी पूल पाण्याखाली गेला असून तालुक्यातील सहा बंधार्‍यावरील वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. भीमेचा विसर्ग येत्या चोवीस तासात लाख क्युसेकहून अधिक असणार आहे व तो याहून अधिक वाढत जाणार आहे. कहे पाहता पंढरीत नदीकाठी नगरपरिषदेेने आवश्यक त्या उपाय योजना केल्या आहेत.शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दयानंद गावडे यांनी नदीकाठी प्रत्यक्ष पाहणी केली. पंढरपूरचे प्रातांधिकारी सचिन ढोले यांनी भाविकांना नदीकडे न जाण्याचे आवाहन केले आहे.
13 वर्षानंतर वीरमधून लाखाचा विसर्ग वीर धरणाच्या इतिहासात आजवर पाच वेळा एक लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडले गेले आहे. यापूर्वी 2006 मध्ये वीर मधून नीरा नदीत 1 लाख 2 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. आता 2019 मध्ये ही सोमवार 5 ऑगस्ट रोजी एवढाच विसर्ग नदीत सोडला गेला आहे. 1976 ला 1 लाख 32 हजार, 1983 ला 1 लाख 30 हजार तर 1997 ला 1 लाख 18 हजार क्युसेक पाणी सोडले गेले होते. या धरणातून सर्वाधिक पाणी 1 लाख 80 हजार क्युसेक इतके सोडता येते
ग्लोबल न्युज नेटवर्क: