उच्चशिक्षित आदर्श राजकारणी व शिक्षणदूत डॉ प्रतापसिंह पाटील यांचा आज वाढदिवस जाणून घ्या त्यांच्याविषयी

प्रा. सतीश मातने/ अशोक सोन्ने-पाटील

डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल न्युज मराठीच्या वाचकांसाठी त्यांच्या कार्याचा हा व्यक्तीविशेष.

डॉ.प्रतापसिंह पाटील हे नाव गेल्या पाच वर्षापासून उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणांच्या मनावर आधिराज्य गाजवणार नाव.डॉ.प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूकीपासूनच उस्मानाबाद जिल्ह्याच्या समाजकारणात प्रवेश केला होता.

गुणवंत विद्यार्थी सत्कार, दुष्काळग्रस्त भागांतील लोकांना अन्नधान्य वाटप,विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन,आरोग्य शिबीर,महिला बचतगट मेळावे,कृषीविषयक मार्गदर्शन शिबीरे राबवून जिल्ह्यात एक नविन पॕटर्न तयार केला.

त्याबरोबरच सामान्यातील सामान्य माणसांला वाढदिवसाच्या निमित्ताने फोन करणारे ते जिल्ह्यातील पहिलेच राजकारणी असतील.या सर्व कार्याला कोणत्या तरी पक्षाचा आधार असणे गरजेचे असते म्हणून त्यांनी ६ जानेवारी २०१९ ला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे,मनुष्यबळ कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकुर यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत व उस्मानाबाद,लातूर, नांदेड,हिंगोली येथील बुथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख यांच्यासमक्ष प्रवेश केला.

तो उस्मानाबाद लोकसभेचे तिकीट मिळवण्याच्या उद्देशाने व पक्षाकडूनही त्यावेळी त्यांना ग्रीनसिग्नल दिल्याचे समजते.पण २०१९ च्या निवडणूकीत शिवसेना-भाजपाची युती झाल्याने ही जागा शिवसेनेला सुटली व डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी गेल्या पाच वर्षात लोकसभा डोळ्यासमोर ठेवुन केलेल काम व्यर्थ गेल अशी लोकभावना झाली.

मात्र कुठलाही विलंब न लावता किंवा आपल्याला लोकसभेच तिकीट भेटल नाही त्यामुळे खचुन न जाता त्यांनी शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांचा तन मन धनाने कुठलीही अपेक्षा न ठेवता रात्रदिवस प्रचार केला.खुद्द खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील महायुतीच्या पहिल्या सभेत सर्व नेते व कार्यकर्ते यांच्या समक्ष सांगितले की, खासदारकीच्या दृष्टीने कार्य करणारे प्रतापभैय्या हे पहिले नेते आहेत मात्र भैय्या राजकारणात संधी मिळत आसते

आपण फक्त योग्य संधीची वाट पहायची असते.आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ते भाजपामध्ये काम करत असुन भाजपाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्याचा ते प्रयत्न करत आहेत.या कष्टाचे फळ पक्ष त्यांना नक्कीच देईल असा आशावाद त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.येणारी विधानसभा,मराठवाडा पदवीधर निवडणूकीत त्यांच्या नावाचा विचार पक्ष प्राधान्याने करेल असच सध्याच राजकीय वातावरण आहे.

भाजपा पक्षाच्या चौकटीत राहून त्यांचा विवाहसोहळे,छावण्याभेट, वाढदिवस यासह सुखदुखाच्या प्रसंगात अविरतपणे जनसंपर्क चालूच आहे.केवळ निवडणूकीपूरत लोकांच्या संपर्कात न राहता १२ महिने २४ तास लोकांच्या संपर्कात असणारा लोकनेता म्हणून त्यांची समाजात स्वच्छ प्रतिमा तयार झाली आहे.

उच्चशिक्षीत,अभ्यासू क्विविध राजकिय पक्षात पाहुण्यांचा गोतावळा,स्वच्छ प्रतिमा,दांडगा जनसंपर्क,वैयक्तिक यंत्रणा व आर्थिक सुबत्तता या बाबी त्यांना कोणतीही ऊमेदवारी मिळवण्यासाठी पोषक ठरतील असच सध्याचे चित्र आहे.

असा नेता आता लोकसभेत नसला तरी किमान विधीमंडळात दिसावा अशी सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांची इच्छा आहे.त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत व त्यांना उदंड आयुष्य लाभो याच ग्लोबल न्युज मराठीच्यावतीने शुभेच्छा.पूनश्च एकदा डॉ.प्रतापसिंह पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

महाराष्ट्रात च नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही गोवा, आसाम, छत्तीसगड आदी राज्यात वडील माजी कुलगुरू डॉ वेदप्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊ आमदार डॉ राहुल पाटील व डॉ उदयसिंह पाटील यांच्या सोबत असंख्य कुटुंबामध्ये ज्ञानाचा दिवा पेटवणारे,मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेण्याची ऐपत नसणाऱ्यासाठी महाराष्ट्राभर शिक्षणाचे जाळे विणनारे हजारो शिक्षक,कर्मचारी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारे,वेळात वेळ काढुन असंख्य गरिब श्रीमंताच्या,सुख दुखात सहभागी होणारे भारतीय जनता पार्टीचे लोकनेते,प्रेमळ, उच्चशिक्षित,अभ्यासु म्हणून भैय्या साहेबाची ओळख आहे.

धिरज करळे: