आ़ दिलीप सोपल राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक 40 जणांच्या यादीत समावेश

बार्शी, –
लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 40 स्टार नेत्यांची यादी जाहीर केली असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. दिलीपराव सोपल यांचा या यादीत समावेश केला आहे़ त्यामुळे आ़ सोपल यांची तोफ आता प्रचरासासाठी राज्यभर धडधडणार आहे़
राष्ट्रवादी कॉगे्रसच्यावतीने आज ही यादी प्रसिद्ध करण्यात आली़ यामध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापासून जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, खा़ सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, धनंजय मुंढे, डॉ़ अमोल कोल्हे, शंकरसिंग वाघेला आदी नेत्यांचा समावेश आहे़ यामध्ये यंदा आ.़ दिलीपराव सोपल यांचेही नाव 21 व्या क्रमांकावर आहे़ आ़ दिलीपराव सोपल हे सुरुवातीपासूनच एक पट्टीचे वक्ते म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहेत.़ हजरजबाबीपणा व मिस्कील शैली यामुळे लोकांना त्यांचे भाषण भावते. अगदी शेलक्या शद्बात हे विरोधकांचा समाचार घेतात़ तसेच राज्याच्या राजकारणाचा त्यांना दांडगा अनुभव आहे़ राज्यपातळीवरील कॅबिनेट मंत्र्यापासूनची विविध पदे त्यांनी भूषवली आहेत़ आ़ सोपल यांचा राज्याच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश असला तरी त्यांच्यावर खरी जबाबदारी असणार आहे ती म्हणजे उस्मानाबाद लोकसभेची़ उस्मानाबाद लोकसभेचा प्रचार करताना त्यांनी बार्शी तालुक्यात देखील प्रचार करावा लागणार आहे.़ कारण बार्शीच्या राष्ट्रवादीची संपूर्ण भिस्त ही आ़ सोपल यांच्याच खांद्यावर असणार आहे़ स्टार यादीत समावेश झालेले आ़ दिलीपराव सोपल हे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील एकमेव नेते आहेत़ सोपल यांना भाषणाला राज्यभर मागणी असते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या भाषणशैलीचा पक्षासाठी कसा उपयोग करुन घेणार हे येणारा काळच ठरवेल़

admin: