आर्मीवाल्यांमध्ये मला ‘देव’ दिसला म्हणून पाया पडले ; व्हायरल व्हिडिओतील महिलेने व्यक्त केली भावना 

गेल्या दोन दिवसापासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये एक महिला आर्मीच्या जवानाच्या सतत पाया पडताना व हाथ जोडत असताना दिसत आहे. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या महिलेने आर्मीवाल्याला देव मानून पाया पडण्याचे कारण स्पष्ट केले. या महिलेचे नाव सुजाता आंबी असे आहे.

सुजाता आंबी यांनी सांगितले, ‘पूरपरिस्थिती आल्यानंतर २ दिवसांत आम्हाला मदत मिळाली. सगळीकडे पाणीच पाणी दिसत होतं त्यात मदत करत असताना बोटीदेखील उलटत होत्या त्यामुळे आम्ही घाबरलो होतो. आमची मुलं संपूर्ण कुटुंब या बोटीत होतं. पण आर्मीवाल्यांनी आम्हाला व्यवस्थित पोहोचवलं, आणि म्हणून मला त्यांच्या पाया पडावसं वाटलं. आमच्या मदतीला ते देवासारखे धावून आले होते. ‘

तर काय झालं असतं :

‘बोट जेव्हा पाण्यातून वाट काढत असताना वाटेत साप आडवा आला, पण आर्मीवाल्यांनी त्याला झटकन बाजूला केला. तो आमच्या बोटीत शिरला असता, तर काय झालं असतं? याचा विचार करूनच भीती वाटते. आर्मीवाल्यांनी मात्र असं होऊ न देता अनर्थ टाळला.’ अशी भावना सुजाता आंबी यांनी व्यक्त केली.त्यामुळे आर्मीवाले अमच्यासारख्या पूरग्रस्तांसाठी देव होऊनच आले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: