आरे कारशेडला स्थगिती देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद – आशिष शेलार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी आरे कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत पुढचा विचार होत नाही तोपर्यंत आरे कारशेडमधलं एक पानही तोडले जाणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. रातोरात झाडांची कत्तल मंजूर नाही असंही ते म्हणाले आहेत. एका रात्रीतून झाडच काय झाडाचं पानही तोडता येऊ नये असे ते म्हणाले. मात्र यानंतर आशिष शेलार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. हा निर्णय मुंबईकरांसाठी घृणास्पद असल्याचेही ते म्हणाले आहेत.

आशिष शेलारांनी ट्विट करत महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवर टीकास्त्र डागले आहे. “धनुष्यबाणा”च्या “हातात” “घड्याळ” बांधले जाते तेव्हा, विकासाचे काटे आणि चक्र उलटीच फिरणार! 70 % काम पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद.. मुंबईकरांच्या प्रश्नांवर असे राजकारण बरे न्हवे!! असे म्हणत त्यांनी टीका केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: