आम्हाला गांजा लागवडीसाठी परवानगी द्या;शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आम्हाला गांजा लागवडीसाठी परवानगी द्या;शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरोनाच्या संकटामुळे देशासह राज्याची अर्थव्यवस्था खालावली आहे.त्यामुळे सरकारने दारूची दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे.जर नशेचा बाजार सुरू करून शासनाचे उत्पन्न वाढणार असेल तर येत्या हंगामात आम्हा शेतकऱ्यांना गांजा पिकवण्यासाठी परवानगी द्यावी. अशी मागणी श्याम गाडेकर या शेतकऱ्यांने मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

यापूर्वी ही देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी गांजा उत्पादन करण्यास परवानगी द्या, अशी मागणी उस्मानाबाद येथील शेतकरी वैभव मोटे यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांंच्याकडे केली आहे.

गिरवली ता. भूम येथील रहिवाशी असलेले वैभव मोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत मेल केला आहे. माझ्या शेतात मी एक एकर गांजा लागवड करु इच्छित आहे.

गांजा उत्पादनानंतर शासन जो ठरवून देईल तेवढा कर भरायला मी तयार आहे. दारु उत्पाादन आणि विक्री करुन जर अर्थव्यवस्थेला उभारी मिळत असेल तर अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी मला गांजा उत्पादनाची परवानगी द्यावी. अर्थव्यवस्था मजबूत करण्यात मी माझे योगदान द्यायला तयार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये मद्य विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. मद्य विक्रीतून शासनाला मोठा महसूल मिळतो. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पण या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे.

मद्य विक्रीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा होतील. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, असा तर्क आहे. वैभव मोटे व श्याम गाडेकर यांच्या उपहासात्मक मागणीमुळे वेगळ्या चर्चेला तोंड फोंड उठले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: