आमदार संग्राम जगतापांच्या पक्ष बदलाच्या केवळ अफवाच : वाचा सविस्तर…

ग्लोबल न्यूज नेटवर्क: कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर चे आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत जाणार अशा जोरदार वावड्या सोशल मीडियावर माध्यमातून उठवल्या जात होत्या, मात्र आज राज्यव्यापी दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नगर येथील कार्यक्रमात आमदार जगताप यांनी हजेरी लावून या कथित पक्ष बदलाच्या या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून युवकांचे प्रदेशाध्यक्ष शेख, कार्याध्यक्ष वरपे यांची टीम राज्याच्या दौऱ्यावर असून जिल्हा लेव्हलवर ते कार्यकर्त्याच्या बैठका घेत आहेत. आज ही टीम अहमदनगर मध्ये आल्यावर आमदार संग्राम जगताप यांनी स्वागत तर केलेच परंतु राष्ट्रवादी युवक काँग्रेस बूथ कमिटी मेळाव्याला ही उपस्थिती लावली.

यावे कार्याध्यक्ष रविकांतजी वर्पे, निरीक्षक किशोरजी मासाळ, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा खोसे, जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: