मुंबई : राज्याचं नेतृत्व इथून पुढे शिवसेनाचं करेल. यापुढे राज्यात शिवसेनेचाचं मुख्यमंत्री होईल, असा विश्वास शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी पुन्हा व्यक्त केला आहे. शिवसेना आमदारांच्या झालेल्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेच्या भूमिकेत पहिल्या दिवसापासून बदल नाही. पहिल्या पासून भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला सर्व आमदारांचा पाठींबा असणार आहे. युती तोडण्याचा पाप करणार नही, हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट बैठकीत केलं आहे असे ही राऊत म्हणाले.
पत्रकार परिषदेतील मुद्दे
अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव आला तर बोलणी सुरू होतील
‘ठरल्या प्रमाणे करा’ असा आमचा एका ओळीचा प्रस्ताव आहे
आमच्याकडे पर्याय आहे, त्याशिवाय आम्ही बोलत नाही
संख्याबळ झालेलं आहे, ते आम्ही सभागृहात दाखवू
शिवसेना आशेवर नाही तर आत्मविश्वासावर जगते
भाजपने जाहीर करावं की आम्ही सरकार बनवण्यास असमर्थ आहोत, मग शिवसेना पुढी कार्यवाही करेल
महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच
सत्तेची हवस सोडून द्या आणि सांगा की आम्ही सत्ता स्थापू शकत नाही
सगळ्यात मोठा पक्ष असूनही भाजप सत्ता स्थापन करत नाही याचा अर्थ हा होतो की ते संख्याबळ जमवू शकलेले नाही
शिवसैनिक असेल असं म्हणत असाल तर शिवसैनिकाप्रमाणे दिलेला शब्द पाळा, शिवसैनिक नेहेमी सत्याच्या मार्गावर चालतो, तो चुकीच्या मार्गावर चालत नाही
देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते, त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की ‘उपमा, अलंकार वापरून राजकारण होत नाही’
साम,दाम.दंड,भेद हा व्यक्तीचा नाही तर सत्तेचा असतो
आता कोणतेही घटनाविरोधी कृत्य, दबाव, धमक्या चालणार नाही
2014 सालची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात फरक आहे
त्यांनी सांगितले की जनादेश महायुतीला मिळाला आहे, असं असेल तर मग सत्तास्थापनेचा ते दावा का सादर करत नाही ?
राजभवनाबाहेर चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांची पत्रकार परिषद ऐकली
24 तारखेला निकाल लागल्यावर उद्धव ठाकरेंनी हेच सांगितले, विधीमंडळ पक्षनेता निवडीमध्ये देखील हेच सांगितले की युती तुटेल असे मी काहीच करणार नाही
अस्थिरता ज्यांच्यामुळे निर्माण होते आहे ते महाराष्ट्राचे नुकसान करीत आहे
जो निर्णय उद्धव ठाकरे घेतील तो आम्हाला मान्य असेल असे आमदारांनी सांगितले
शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी एकमुखाने उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला
भाजप त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत का हा त्यांना प्रश्न विचारा
शिवसेना आणि उद्धव ठाकरे नेहेमी भूमिकेवर छाम राहिलेले आहे
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात