आधी एकनाथ शिंदे मग विखेंना खेचून नेले, आता वडेट्टीवारांना घेऊन जाऊ नका : अजित पवार

मुंबई |  सर्वांत आधी एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले, मुख्यमंत्र्यांनी त्यांना आमच्यातून हिरावून घेतले. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्षनेते केले, त्यांनाही तुम्ही खेचून घेतले. आता आम्ही विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते करत आहोत. आता त्यांनाही तुम्ही घेऊन जाऊ नका या माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सभागृहात हशा पिकला.

राज्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अधिवेशनात बोलत होते

अजित पवार यांच्या या  कोटीवर विरोधी पक्षांसह सत्ताधारी सदस्यही मनसोक्त हसले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी सरकारची बाजू सावरत याला उत्तर दिले. की, लोकशाहीमध्ये कुणालाही कोणत्याही पक्षात जाण्याचा अधिकार आहे. उद्या  यांनी इच्छा व्यक्त केल्यास आम्ही त्यांच्या मागणीचा विचार करू, असे म्हणत फिरकी घेतली.

याच वेळी वड्डेटीवार यांनी मुनगंटीवार यांची ऑफर धुडकावून लावली व म्हणाले की, मी एकदाच पक्ष बदलला आहे. त्यानंतर वारंवार निष्ठा बदलणे माझ्या स्वभावात नाही, असे सांगत राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला.

धिरज करळे: